-
अनेकदा मोठ्या पडद्यावर कलाकार नकारात्मक भूमिका करणे टाळतात पण संजय दत्तने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. अग्निपथ चित्रपटात खलनायकाची भूमिका करून त्याने हे सिद्ध केलं की तो कोणतेही पात्र उत्तम प्रकारे साकारू शकतो.
-
संजय दत्तने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले आहे.
-
‘अलादीन’ चित्रपटात रिंग मास्टरच्या भूमिकेसाठी अनेकांनी अभिनेत्याचे कौतुक केले.
-
‘अग्निपथ’ या चित्रपटातील कांचा चीनाची नकारात्मक व्यक्तिरेखा संजय दत्तमुळे प्रेक्षकांना खुप आवडली होती.
-
बॉलीवूडसह संजय दत्तने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
-
संजय दत्तने ‘केजीएफ’ चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात संजय दत्तने ‘अधीरा’ची भूमिका साकारली होती.
-
आता पुन्हा एकदा संजय दत्त आपल्या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारनार आहे.
-
या दाक्षिणात्य चित्रपटात अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहे. ‘डबल स्मार्ट’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
-
‘डबल स्मार्ट’ चित्रपटात राम पोथिनेनी आणि काव्या थापर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक