-
दक्षिण चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी हीट चित्रपटांनी देऊन बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे.
-
दक्षिण चित्रपटसृष्टीत प्रभास, अल्लू अर्जुन, राम चरण, व रजनीकांत या सुपरस्टार अभिनेत्यांची कोट्यावधी संपत्ती आहे.
-
मात्र दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता अक्किनेनी नागार्जुन अव्वल स्थानावर आहे.
-
नागार्जुन हे दक्षिणेतील सर्वांत अनुभवी कलाकारांपैकी एक आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागार्जुन यांची एकूण संपत्ती ३,१०० कोटी रुपये आहे.
-
नागार्जुन हे एका चित्रपटासाठी ९ ते २० कोटी रुपयांच मानधन घेतात.
-
अभिनयाव्यतिरिक्त नागार्जुन एक यशस्वी व्यापारीदेखील आहेत. अन्नपूर्णा स्टुडिओ नावाचे त्यांचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे.
-
केरळ ब्लास्ट फुटबॉल क्लब आणि इंडिया सुपर लीग क्लबचे ते सह-मालक आहेत. नागार्जुन यांनी मोटारस्पोर्ट्स आउटफिट बनविणाऱ्या अनेक कंपन्यांमध्येही पैसे गुंतवले आहेत.
-
नागार्जुनचे देशातच नव्हे, तर परदेशातही व्यवसाय आहेत. दुबईच्या अनेक रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. नागार्जुन ‘मां टीव्ही’चे मालकदेखील आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

America : ‘हातात बेड्या, १६ तास अन्न नाही, प्राण्यांसारखी वागणूक, १४० दिवस…’, नवविवाहित तरुणीने सांगितली अमेरिकेतील वेदनादायी कहाणी