-
पूजा सावंतचा विवाहसोहळा २०२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात पार पडला.
-
अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अलीकडच्या काही दिवसात पूजा परदेशातून येऊन-जाऊन प्रवास करताना दिसते.
-
आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी संपूर्ण सावंत कुटुंबीय ऑस्ट्रेलियात गेले आहेत.
-
पूजाचे आई-बाबा आणि दोन्ही भावंडांनी मिळून यंदा अभिनेत्रीच्या ऑस्ट्रेलियातील घरी ख्रिसमस साजरा केला.
-
पूजाच्या बहिणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सगळे कुटुंबीय एकत्र वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
ख्रिसमस साजरा केल्यावर हे सगळेजण मेलबर्न स्टेडियममध्ये क्रिकेट मॅच पाहण्यासाठी पोहोचले होते.
-
मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे.
-
पूजा व तिच्या कुटुंबीयांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील हा सामना लाइव्ह पाहिला.
-
मॅच पाहायला गेलेल्या पूजाने वेस्टर्न लूक केला होता. यामध्ये अभिनेत्री अतिशय डॅशिंग व सुंदर दिसत होती. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत व रुचिरा सावंत इन्स्टाग्राम )

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक