-
मकर संक्रांत असा हिंदू सण आहे; जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. तसेच ‘तिळगूळ घ्या; गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते.(फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
मकर संक्रांतीला स्त्रिया हळदीकुंकू ठेवतात आणि इतर स्त्रियांना वाण देतात. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त अर्धा किलो तिळाचे लाडू बनवण्याची कृती पाहणार आहोत. तसेच हे लाडू मऊ कसे राहतील यासाठी एक खास टीपसुद्धा पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
तिळाचे लाडू बनवण्यासाठी, तीळ अर्धा किलो, शेंगदाणे पाव किलो, चण्याची डाळ २५ ग्रॅम, अर्धा किलो गूळ, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कृती – सगळ्यात पहिल्यांदा टोप किंवा कढईत तीळ आणि शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्या. भाजून घेतल्यावर एका ताटात काढून ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
नंतर कढई घ्या आणि एक चमचा तेल किंवा तुपात गूळ बारीक करून टाका आणि गूळ पूर्ण वितळवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बोटाला गूळ चिकटतो आहे का हे तपासून घ्या आणि मग नंतर शेंगदाणे, तीळ, वेलची पावडर, भाजलेल्या चण्याची डाळ आदी सर्व टाकून मिश्रण हलवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मिश्रण एकजीव झाल्यावर ताटात काढून घ्या आणि लाडू वळण्यास सुरुवात करा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
(टीप- मिश्रण गरम असताना लाडू वळून घ्या. मिश्रण गरम असताना लाडू वळून घेतल्यास लाडू सहज वळता येतात आणि ते मऊसुद्धा होतात.) (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
अशा प्रकारे तुमचे संक्रांतीनिमित्त ‘तिळाचे मऊ लाडू’ तयार. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच