-
तुम्ही स्वतःशी बोलता का?
कधी आरशात पाहताना स्वतःशी गप्पा मारल्या आहेत का? एकट्यानं चालताना मनात स्वतःला प्रश्न विचारले आहेत का? जर हो, तर तुम्ही एक चांगली सवय जोपासत आहात. यालाच ‘स्वतःशी बोलणं’ म्हणतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
मनाचं आरोग्य सुधारण्याचं साधं तंत्र
मानसशास्त्र सांगतं की, स्वतःशी बोलणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेणं सोपं जातं आणि मनाला सकारात्मक दिशा मिळते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
स्वतःशी बोलणं म्हणजे नेमकं काय?
स्वतःशी बोलणं म्हणजे आपण स्वतःशी संवाद साधणं- कधी शब्दांत, कधी विचारांत. आपल्या डोक्यात एक ‘आंतरिक आवाज’ असतो, जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
विज्ञान काय म्हणतं?
संशोधनानुसार, जे लोक स्वतःशी बोलतात, त्यांची बुद्धी अधिक तीव्र असते. त्यांना कठीण प्रश्न सोडवताना मदत होते आणि स्वतःचे विचार त्यांना अधिक स्पष्टपणे समजतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
शब्दांची ताकद ओळखा
आपण स्वतःला काय म्हणतो याचा आपल्या मनावर खोल परिणाम होतो. त्यामुळे स्वतःशी बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत. कारण- मन त्याचं चित्र तयार करतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
विचार स्वच्छ आणि स्पष्ट होतात
गोंधळलेले असाल, तर स्वतःशी बोलून बघा. आपले विचार शब्दांत मांडल्याने काय योग्य आहे हे लक्षात येतं आणि निर्णय घेणं सोपं जातं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
ध्येयावर लक्ष केंद्रित राहतं
स्वतःशी संवाद साधल्यानं तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांची सतत आठवण होत राहते. त्यामुळे तुमचा फोकस टिकतो आणि काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
स्वतःलाच मोटिव्हेट करा
दुसऱ्यांकडून प्रेरणा मिळतेच; पण स्वतःला “मी करू शकतो”, असं सांगणं जास्त ताकद देतं. स्वतःशी हेच बोलणं तुम्हाला चालना देतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
नकारात्मक बोलणं घातक ठरू शकतं
जर तुम्ही कायम स्वतःला कमी लेखत असाल, तर ते तुमच्या मनावर वाईट परिणाम करू शकतं. अशा बोलण्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
अशा वाक्यांपासून सावध राहा
“मी अपयशी आहे”, “हे माझ्यापासून होणार नाही” अशा वाक्यांनी मनात भीती आणि शंका वाढते. सकारात्मक विचार ठेवा. तेच तुम्हाला यशाकडे घेऊन जातात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
नकारात्मक विचार पकडायला शिका
तुमचं मन कुठे आणि का अडतंय हे ओळखा. अपयश, भीती किंवा वारंवार येणारे निराशेचे विचार हे तुमचं मन खचवतात. अशा वेळी थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा : “हे विचार मला मदत करत आहेत का?” (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
जादुई शब्दांचा वापर करा
“मी अपयशी ठरलो”, असं म्हणण्याऐवजी, “मी यातून शिकत आहे”, असं बोला. सकारात्मक शब्द तुमचं मन शांत करतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला बळ देतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
शब्द बदला, विचार बदलेल
तुम्ही जसे शब्द वापरता, तसं तुमचं मन तशीच भावना तयार करतं. म्हणून नेहमी सकारात्मक बोलण्याचा सराव करा. चांगले शब्द + चांगले विचार = चांगले जीवन! (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान