-
उत्तर प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकांमुळे घोडेबाजाराची तुफान चर्चा झाली असली, तरी त्याहून जास्त चर्चा या निवडणुकीत किंग मेकर ठरलेल्या ‘राजा भैय्या’ उर्फ आमदार रघुराज प्रताप सिंह यांची होती. ऐनवेळी त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला मत देण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती.
-
लोकशाही जनसत्ता पक्षाचे अध्यक्ष आमदार राजा भैय्या यांनी २०२२ च्या निवडणुकीत जाहीर केलेल्या आकड्यांनुसार त्यांच्याकडे एकूण २३ कोटी ६९ लाख ७१ हजार ३८ रुपये मूल्याची संपत्ती आहे!
-
राजा भय्या, त्यांच्या पत्नी भानवी कुमारी सिंह आणि त्यांच्या मुलांच्या नावे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ८ कोटी २२ लाख २८ हजार १५८ रुपये जमा आहेत!
-
राजा भय्या यांच्याकडे एकूण १६ कोटींची संपत्ती व ७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
-
उत्तर प्रदेशच्या कुंडा विधानसभा मतदारसंघातून राजा भैय्या आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. त्यांच्याकडे जवळपास ६ कोटींचे दागिने आहेत.
-
राजा भैय्या शस्त्रांचेही शौकीन आहेत. दोघा पती-पत्नीकडे पिस्तुल, रायफल आणि बंदूक आहे. या शस्त्रांची किंमतही जवळपास ४ ला ३० हजारांच्या घरात आहे.
-
राजा भैय्यांकडे ४० लाख रुपयांची टोयोटा रेंज रोव्हर कार आहे. त्यांच्याकडे एक लँड क्रूजर कारही असल्याचं सांगितलं जात असून त्याची किंमत १ कोटींच्या घरात आहे!
-
त्यांचा मतदारसंघ असणाऱ्या कुंडामध्ये राजा भैय्या यांच्या मालकीची २.४ कोटी रुपयांची शेतजमीन आहे. याशिवाय ३.४ कोटी रुपयांचा आणखी एक भूखंडही त्यांच्यानावे आहे.
-
याव्यतिरिक्त राजा भैय्या यांच्याकडे प्रतापगड, प्रयागराज आणि दिल्लीत प्रत्येकी एक घर आहे. या घरांच्या किंमतीही प्रत्येकी २ कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं.

Today’s Horoscope: चंद्र गोचरमुळे १२ राशींपैकी कोणत्या राशीच्या आयुष्यात येणार सुखाचे वळण? कोणाला होणार लाभ? वाचा राशिभविष्य