-
हार्दिक पांड्याने आतापर्यंत 66 एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३.८० च्या सरासरीने १३८६ धावा केल्या आहेत आणि ६३ बळी घेतले आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
हार्दिक पांड्या हा तो वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याच्या शोधात भारत खूप दिवसांपासून पाहत होता. त्याने खालच्या फळीत फलंदाजीला उतरून फिनिशर म्हणून तो काय करू शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे. (सौजन्य – ट्विटर)
-
रवींद्र जडेजा हा टीम इंडियाचा थ्री डायमेंशनल खेळाडू आहे. तो फलंदाजी करू शकतो, गोलंदाजी करू शकतो आणि तो जबरदस्त क्षेत्ररक्षणही करतो. (सौजन्य – ट्विटर)
-
जडेजाने १७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२.६२ च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत. त्याने तितक्याच सामन्यात ४.९२ इकॉनॉमीसह १८९ विकेट्सही घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
वॉशिंग्टन सुंदर आपल्या फिरकी गोलंदाजीसह तो मोठे शॉट्स खेळण्यासाठी देखील ओळखला जातो. (सौजन्य – ट्विटर)
-
सुंदरने ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ डावात ४८.३३ च्या सरासरीने १४५ धावा आणि ८ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
शार्दुल ठाकुर देखील एक अष्टपैलू खेळाडू असून त्याने २८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५.८० च्या सरासरीने २५८ धावा केल्या आहेत. तितक्याच सामन्यांमध्ये ठाकूरने ६.४४ च्या इकॉनॉमीसह ४० विकेट्स घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
दीपक हुडाने ७ एकदिवसीय डावात २५.५० च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने ६ एकदिवसीय डावांमध्ये ४.७६ च्या इकॉनॉमीसह ३ विकेट्स घेतल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)
-
रवींद्र जडेजाच्या अनुपस्थित अक्षर पटेलने मिळालेल्या संधीचे सोने करताना, ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४.४० च्या इकॉनॉमीसह ५३ विकेट घेतल्या आहेत. त्याने २४ एकदिवसीय डावात १७.०६ च्या सरासरीने २७३ धावा केल्या आहेत. (सौजन्य – ट्विटर)

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrest : पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”