-
Asia Cup final, IND vs PAK : आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्ता यांच्यात आज खेळला जाणार आहे. (Photo: Social Media)
-
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मापासून ते वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहपर्यंत, कोणते खेळाडू आहेत जे पाकिस्तानला जेरीस आणू शकतात… चला पाहूयात (Photo: Social Media)
-
अभिषेक शर्मा
अभिषेक शर्माच्या फॉर्म पाहता तो आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतासाठी एकहाती विजय खेचू शकतो. तो या आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये आधीच आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे, त्याची बॅट पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध हल्ला करताना आपल्याला दिसू शकते. (Photo: Social Media) -
सूर्यकुमार यादव
आशिया कप २०२५ मध्ये एका डाव वगळता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट शांत राहिली आहे. तथापि, तो आता अंतिम सामन्यात आक्रमक खेळी करु शकतो. आता सर्वात तगडा सामना पाकिस्तानविरुद्ध होत आहे. पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाज देखील आहेत, त्यामुळे सूर्यकुमार यादवची बॅट पराक्रम दाखवू शकते आणि तो या सामन्यात भारताला जिंकून देणारी इनिंग खेळू शकतो. (Photo: Social Media) -
हार्दिक पांड्या
आशिया कपच्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू ठरू शकतो. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये त्याच्या चपळतेसाठी ओळखला जातो. तो भारतासाठी योग्य वेगवान गोलंदाज आणि फिनिशर म्हणून काम करतो. (Photo: Social Media) -
आजच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताला त्याच्या १००% कामगिरीची आवश्यकता असेल. असं असलं तरी शेवटच्या सुपर फोर सामन्यात त्याला दुखापत झाली आहे, जी निश्चितच भारतासाठी चिंतेचे कारण आहे. (Photo: Social Media)
-
कुलदीप यादव
भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव अनेकदा पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करतो. पाकिस्तानी फलंदाज त्याच्या फिरकीला खेळू चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. जर कुलदीपने पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीतून जादू दाखवली तर पाकिस्तानचा पराभव निश्चित आहे. कुलदीप या आशिया कपमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. अंतिम फेरीत दमदार कामगिरी करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. (Photo: Social Media) -
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहची झंझावाती कामगिरी अंतिम सामन्यात दिसून येईल अशी अपेक्षा आहे. सुपर फोर सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी बुमराहला फटकावलं होतं. पण, बुमराह पुनरागमन करण्यात पटाईत आहे, हे सर्वांना माहिती आहे. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात बुमराह पाकिस्तानला पराभूत करू शकतो. तो खूप चांगली गोलंदाजी करत आलेला आहे. (Photo: Social Media)

लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट