-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मस्क आणि ट्रम्प यांचा वाद जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये एलॉन मस्क यांची महत्वाची भूमिका राहिली. एवढंच नाही तर ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू म्हणून मस्क यांच्याकडे पाहिलं जात होतं.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
काही दिवसांपूर्वी मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले आणि त्यानंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. यावरून दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ट्रम्प आणि मस्क यांच्या वादाचं मूळ कारण म्हणजे अमेरिकत नुकतच मंजूर झालेलं ‘बिग ब्युटीफुल बिल’ हे विधेयक. याच विधेयकावरून त्यांच्यातील मतभेदाला सुरूवात झाली.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
त्यानंतर उद्योगपती एलॉन मस्क यांनी आज मोठा निर्णय घेत थेट नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. तसेच थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले. (फोटो: द इंडियन एक्सप्रेस)
-
एलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना थेट राजकीय आव्हान दिलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.(फोटो : REUTERS)
-
एलॉन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्षाचं नाव ‘अमेरिका पार्टी’ असं असल्याची घोषणा खुद्द एलॉन मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केली आहे.(फोटो : REUTERS)
-
मस्क यांच्या राजकीय पक्षाचं नेतृत्व कोण करणार? याविषयी आता ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक लॉरा लूमर यांनी ‘अमेरिका पार्टी’चे नेतृत्व करणाऱ्या तीन लोकांबाबत मोठी भविष्यवाणी केली. (फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
टकर कार्लसन, मार्जोरी टेलर ग्रीन आणि थॉमस मॅसी हे लवकरच एलॉन मस्क यांच्या नव्या राजकीय पक्षाचा भाग होऊ शकतात असा दावा लॉरा लूमर यांनी केला आहे.(फोटो: द इंडियन एक्सप्रेस)
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या वादानंतर एलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचा पुढील राजकीय प्लॅन काय आहे? याबाबत आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. (फोटो: द इंडियन एक्सप्रेस)

“राज ठाकरे बडव्यांच्या कडेवर बसले”, सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र; म्हणाले, “मनसे अध्यक्ष थकून…”