भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा, वनडे,टी-२० रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर वन
आयसीसीच्या वार्षिक अपडेटनंतर भारतीय क्रिकेट संघ वनडे आणि टी-२० रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारताने जून २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक आणि मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वनडे रँकिंगमध्ये भारताचे १२४ रेटिंग गुण आहेत. न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे. टी-२० रँकिंगमध्ये भारत पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानी आहे.