विनेश फोगटला अजूनही रौप्यपदक मिळण्याची आशा? वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद १६ ऑगस्टला विनेश फोगट खटल्याचा निकाल जाहीर करणार होता, परंतु १४ ऑगस्टलाच विनेशची याचिका फेटाळली. या निर्णयाने विनेश आणि तिच्या वकिलांनाही धक्का बसला. वकील विदुषपत सिंघानिया यांनी सांगितले की, निर्णयाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील १०-१५ दिवसांत संपूर्ण माहिती मिळेल. विनेशला न्याय मिळवण्यासाठी स्विस फेडरल ट्रिब्युनलमध्ये अपील करण्याची शक्यता आहे.