scorecardresearch

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
भाजपाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
भाजपाचे १० ते १५ आमदार फुटणार? ‘या’ राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत? कारण काय?

BJP vs Congress News : भाजपाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असून ते काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, असा दावा…

BBMP dog food scheme biryani bjp vs congress
भटके कुत्रे अन् बिर्याणीचा वाद काय? भाजपाने काँग्रेसवर काय टीका केली?

BBMP dog food scheme भारतातील ‘सिलिकॉन सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात आता भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी एक अनोखी योजना…

Congress leader Sangli, Mohan Wankhade Shiv Sena, Sangli municipal elections, Shinde faction politics, Maharashtra local elections,
सांगलीत काँग्रेसला घरघर

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करून सत्तेची सावलीच विकासासाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित करत असताना…

Loksatta anvyarth Congress government Mallikarjun Kharge Siddaramaiah DK Shivakumar Chief Ministerial post dispute
अन्वयार्थ: काँग्रेसचा पोरखेळ

देशात काँग्रेसची सत्ता असलेली कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश ही ईनमिन तीन राज्ये. यापैकी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार आमदारांच्या बंडानंतरही…

BJP won Chandrapur bank elections as Congress leaders betrayed their own
काँग्रेस नेत्यांमुळेच भाजप उमेदवारांचा विजय! चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत…

आमदार भांगडिया यांच्या पुढाकाराने खासदार धानोरकर महिला गटातून बिनविरोध निवडून येताच त्यांनी रंग बदलण्यास सुरुवात केली.

Sanjay Jagtap Congress district president of Purandar assembly constituency has resigned
संजय जगताप यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

जगताप यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला असून, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडे राजीनामा पत्र…

Uddhav Thackeray and Anil Deshmukh question Public Security Bill after its approval
उद्धव ठाकरेंची संघटनांच्या यादीची विचारणा तर अनिल देशमुखांना जनसुरक्षा कायदा ईडीसारखा …..

जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला

हिमाचलमधील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताना भाजपा खासदार कंगना रणौत
कंगना रणौत यांच्या ‘त्या’ दौऱ्यामुळे भाजपा अडचणीत? हिमाचलमध्ये काय घडतंय?

BJP MP Kangana Ranaut : भाजपा खासदार कंगना रणौत यांनी केलेलं एक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. काँग्रेसने याच मुद्द्याला…

Chandrapur District Bank Election Results Announced
चंद्रपूर जिल्हा बँक निवडणूक : दिनेश चोखारे एक, तर गजानन पाथोडे दोन मतांनी विजयी; माजी आमदार निमकर…

सर्वाधिक संचालक आपलेच निवडून आल्याचा दावा काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या वतीने

संबंधित बातम्या