कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
सिंधुदुर्गमधील आंबोलीजवळ कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचे राजेंद्र सनगर दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, शनिवारी…
कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना विशेष…
धबधब्याखाली मनमुराद आनंद लुटण्यासाठी तसेच थंडगार पाण्यात डुबकी मारण्यासाठी रविवाी सिंधुदुर्ग, दोडामार्ग, गोवा, कर्नाटकसह इतर राज्यांमधून शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली…
सुमारे दोन महिन्यांपूर्वी गणेश हत्तीने कळपाच्या नेतृत्वासाठी थेट बाहुबलीला आव्हान दिले. त्यांच्यातील संघर्षात बाहुबलीला कळपाचे नेतृत्व सोडून कोल्हापूरच्या दिशेने काढता…