scorecardresearch

सुशीलकुमार शिंदे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय उर्जामंत्री, लोकसभेचे नेते अशा विविध पदावर काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांची ओळख महाराष्ट्राचा संघर्षशील राजकारणी म्हणून आहे. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे लहानपणीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली. १९६५ साली बीए पास झाल्यावर नोकरी सोडून त्यांनी पुणे गाठले. येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाच पोलिस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी मुलाखत दिली आणि पोलिस सेवेत रुजू झाले. काही वर्ष मुंबईच्या सीआयडी विभागात काम केल्यानंतर शरद पवार यांच्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९७१ साली पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला. १९७३ साली सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. सुशीलकुमार शिंदे १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००४ ते २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते.Read More
Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला

देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जुन्या प्रस्थापित नेत्यांकडून दुष्काळी भागात पाणी पोहोचविता आले नाही म्हणून केलेल्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार…

Ram Satpute on Praniti Shinde clashed over the development works of Solapur
Ram Satpute vs Praniti Shinde:सोलापूरच्या विकासकामांवरून राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये जुंपली!

सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी, आम्ही मागील दहा वर्षांचा विकासकामांचा हिशेब तयार आहे, प्रणिती शिंदेंनी १०…

solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

विशिष्ट समाज किंवा सांप्रदायावर पगडा असलेल्या महास्वामीजी, बाबा, महाराजांचा राजकारणात प्रभाव वाढत आहे.

mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान

काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.

What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

सुशील कुमार शिंदेंनी पोटा कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या १२ अतिरेक्यांना वाचवलं आणि लांगुलचालनाचं राजकारण केलं असंही राम सातपुतेंनी म्हटलं आहे.

MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

आमदार सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या तथा आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडतानाच हिंदुत्व…

Sushilkumar Shinde
सुशीलकुमार शिंदे यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब द्यावा, आमदार राम सातपुते यांचे आव्हान

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यातील थेट लढतीला सुरूवातीपासून रंग चढत आहे.

congress leader sushil kumar shinde on mla praniti shinde
Sushil KumarShinde: “ज्यांना जायचं ते जातील”; प्रणिती शिंदेंच्या भूमिकेबाबत सुशिलकुमार स्पष्टच बोलले

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा आहे. पक्षात घेण्यासाठी भाजपाचे…

sushilkumar shinde marathi news, sushilkumar shinde on dictatorship marathi news
“लोकशाहीवर विश्वास नसलेल्या शक्तींमुळे देशाला हुकूमशाहीचा धोका”, सुशीलकुमार शिंदेंचा इशारा

आपला भारत देश गांधी-नेहरूंच्या लोकशाहीवर निष्ठा ठेवणारा आहे. परंतु लोकशाहीवरचा विश्वास नसलेली शक्ती सत्तेवर आल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असे…

sushilkumar shinde praniti shinde
“प्रणिती शिंदेंना फोडण्यासाठी भाजपाने…”, सुशीलकुमार शिंदेंचा दावा; म्हणाले, “सोलापूर लोकसभेसाठी…”

प्रणिती शिंदे या यंदा सोलापूरमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेय. या चर्चेवर प्रणिती शिंदे म्हणाल्या, माझ्या उमेदवारीची…

Praniti Shinde
महाविकास आघाडीचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार ठरला; प्रणिती शिंदे म्हणाल्या, “फक्त घोषणा बाकी”

सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या, आमचा उमेदवार ठरला आहे. परंतु, त्यांचं कधी ठरणार ते माहिती नाही.

What Sushil Kumar Shinde Said?
“भाजपा कुणीतरी छुपारुस्तुम उमेदवार शोधेल आणि…”, सुशीलकुमार शिंदेंचा टोला

प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळावी, मात्र त्याबद्दलचा निर्णय हायकमांड घेईल असंही सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या