scorecardresearch

सुशीलकुमार शिंदे Videos

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय उर्जामंत्री, लोकसभेचे नेते अशा विविध पदावर काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांची ओळख महाराष्ट्राचा संघर्षशील राजकारणी म्हणून आहे. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे लहानपणीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली. १९६५ साली बीए पास झाल्यावर नोकरी सोडून त्यांनी पुणे गाठले. येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाच पोलिस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी मुलाखत दिली आणि पोलिस सेवेत रुजू झाले. काही वर्ष मुंबईच्या सीआयडी विभागात काम केल्यानंतर शरद पवार यांच्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९७१ साली पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला. १९७३ साली सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. सुशीलकुमार शिंदे १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००४ ते २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते.Read More
Ram Satpute on Praniti Shinde clashed over the development works of Solapur
Ram Satpute vs Praniti Shinde:सोलापूरच्या विकासकामांवरून राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये जुंपली!

सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी, आम्ही मागील दहा वर्षांचा विकासकामांचा हिशेब तयार आहे, प्रणिती शिंदेंनी १०…

congress leader sushil kumar shinde on mla praniti shinde
Sushil KumarShinde: “ज्यांना जायचं ते जातील”; प्रणिती शिंदेंच्या भूमिकेबाबत सुशिलकुमार स्पष्टच बोलले

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा आहे. पक्षात घेण्यासाठी भाजपाचे…

Sushil Kumar Shinde on BJP: सुशीलकुमार शिंदेंना आली होती भाजपाकडून ऑफर!, पाहा नेमकं काय म्हणाले?
Sushil Kumar Shinde on BJP: सुशीलकुमार शिंदेंना आली होती भाजपाकडून ऑफर!, पाहा नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील इतर नेतेही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रात…

former union home minister shushil kumar shinde chai pe charcha with solapurkars
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भर सकाळी साधला सोलापूरकरांशी संवाद! | Sushilkumar Shinde

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भर सकाळी साधला सोलापूरकरांशी संवाद! | Sushilkumar Shinde

ताज्या बातम्या