काळानुरूप जगण्याच्या, सिनेमाच्या चिंतनातून प्रगल्भ झालेला, माध्यमांनी तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेपेक्षा एक वेगळाच अनुराग कश्यप या संवादातून समोर आला.
हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पारंपरिक, सरधोपट वाटेवरून न जाता नव्या विषयांवरील, वेगळय़ा धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित करणारे अनुराग कश्यप यांचा प्रवास ‘लोकसत्ता गप्पा’मधून…