अनुराग कश्यप हा बॉलीवूडमधील एक पप्रथितयश दिग्दर्शक आहे. त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही चांगलाच मोठा आहे. अनुरागच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही तुफानच असतो. अनुरागने चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण दिलं, याबरोबरच त्यानं कित्येक नवोदित कलाकारांनाही संधी दिली आहे. अभिनेते, तंत्रज्ञ तसेच इतर बऱ्याच लोकांचं करिअर रुळावर आणण्यात अनुरागचा सिंहाचा वाटा आहे. यापैकीची दोन महत्त्वाची नावं म्हणजे नवाजुद्दीन सिद्धिकी आणि विक्की कौशल.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये अनुरागने या दोघांबद्दल वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळात अनुराग या दोघांबरोबर काम करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अनुरागने यामागील कारणंही सांगितली आहेत. त्याच्या या वक्तव्याने बऱ्याच लोकांचे लक्ष वेधले आहे.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

आणखी वाचा : ‘जवान’चा ट्रेलर पाहून राजकुमार हिरानी यांनी केला शाहरुखला मेसेज; अभिनेता खुलासा करत म्हणाला, “मी त्यांना…”

‘झुम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुराग म्हणाला, “मला कोणत्याही कलाकाराबरोबर काम करायची भीती नाहीये, पण सध्याच्या घडीला नवाजुद्दीन आणि विक्की कौशल यांना त्यांचं मानधन देणं शक्य नाही. ते आता मोठे स्टार झाले आहेत आणि आपसूकच त्यांचं मानधनही वाढलं आहे. माझ्या चित्रपटांचे बजेट फारच कमी असते, त्यामुळे माझे फारसे नुकसान होत नाही, पण त्यात काम करणाऱ्या कलाकारांचे नुकसान होते.”

पुढे अनुराग म्हणाला, “विकी किंवा नवाजुद्दीन हे दोघेही माझ्या मैत्रीखातर माझ्या चित्रपटात कोणतंही मानधन न घेता काम करतीलही. परंतु मला ते योग्य वाटणार नाही. त्यांच्या उपकारांचं ओझं माझ्यावर कायम राहील. बऱ्याचदा या दोघांनी माझ्या चित्रपटात काम करताना बरीच तडजोड केली आहे. विकीने तर एकही रुपया न घेता माझ्याकडे काम करण्याची तयारी दर्शवली होती, पण आता ते शक्य नाही आणि मला त्यांचा गैरफायदाही घ्यायचा नाही.”