माणसापेक्षाही श्रेष्ठ परिपूर्ण बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञानात संशोधन सुरू आहे. माणसाचे अनुकरण करत आणखी वरची पातळी गाठायचा प्रयत्न त्यात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तीन पायऱ्यांपैकी अखेरची पायरी आहे ‘परिपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता’. इंग्रजीमध्ये तिला आर्टिफिशिल सुपर इंटेलिजन्स (एएसआय) म्हणतात.