स्वजाणीव संकल्पना काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. वैज्ञानिक स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न नेटाने करत आहेत. या प्रयत्नांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि आवश्यक मानलेले गुणधर्म यांची तोंडओळख करून घेऊ या.

स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधन आणि विकासामध्ये मुख्यत्वेकरून सखोल-अध्ययन (डीप लर्निग), कृत्रिम चेताजाळी (आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कस्), नैसर्गिक भाषा संस्करण (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) आणि संगणकीय दृष्टी (कॉम्प्युटर व्हिजन) या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शाखांचा उपयोग केला जातो. प्रचंड प्रमाणावरील आणि विविध प्रकारच्या विदाचा (डेटा) अभ्यास करून त्यातून योग्य तो आकृतीबंध (पॅटर्न) शोधणे, उत्तर चुकत असल्यास प्रशिक्षणाद्वारे तर्कपद्धतीमध्ये सुधारणा करून पुन्हा नवीन आकृतीबंध शोधणे आणि योग्य निर्णय घेणे (डिसिजन मेकिंग) ही सर्व प्रक्रिया रास्त रीतीने आणि रास्त कालावधीत पार पाडण्यासाठी सखोल-अध्ययन आणि कृत्रिम चेताजालके यांचा उपयोग होतो. तर, विविध प्रकारचे आगम (इनपुटस्), म्हणजे चित्रे, आकृत्या, छायाचित्रे, लिखित अथवा वाचिक आगम घेण्यासाठी नैसर्गिक भाषा संस्करण आणि संगणकीय दृष्टी यांचा उपयोग केला जातो.

Navpancham Yog
सुर्य आणि केतुने निर्माण केला दुर्मिळ राजयोग! या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार; वैवाहिक जीवनात आनंदी आनंद
readers comments on loksatta editorial
लोकमानस : निदान शब्दप्रयोग तरी बदला
Ulta-Chashma
उलटा चष्मा: मतदान यंत्राची कृपा…
Conversations Between Human and Machines
कुतूहल : भाषापटू यंत्रांची करामत
article about indian psychoanalyst sudhir kakar
व्यक्तिवेध : सुधीर कक्कर
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…

स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेची वैशिष्टये काय असावीत याविषयी अजूनही चर्चा, विवाद सुरू आहेत. तिला मानवाप्रमाणे वैयक्तिक भावभावना असाव्यात, असे शास्त्रज्ञ मानत नाहीत, परंतु तिच्यामध्ये पुढील वैशिष्टय़े अथवा गुणधर्म असावेत असे मानले जाते.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव

कार्य-संदर्भ किंवा प्रचालन संदर्भ : स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेला आपण करीत असलेल्या कार्याचा, आपल्या मर्यादा आणि आपली कार्यपातळी यांचा संदर्भ जरूर असावा. तिने स्वत:च्या क्षमतांची जाणीव ठेवून आपले कार्य करायला हवे.

चुकीची जाणीव : कार्य करताना येणाऱ्या मर्यादा, त्यामुळे होणाऱ्या किंवा अन्यथा होणाऱ्या चुका यांचे स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेला आकलन व्हावे आणि असे घडल्यास स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेने चूक दुरुस्त करायला हवी किंवा चूक झाली आहे अशी सूचना द्यायला हवी.

अध्ययन आणि अनुकूलन : कार्य करीत असताना स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेने अध्ययन आणि अनुकूलन केले पाहिजे. अध्ययनातून तर्कपद्धती आणि निर्णयक्षमता यांच्यात सतत स्व-सुधारणा केली पाहिजे.

स्व-पर्यवेक्षण : कार्य करीत असताना स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेची आंतरिक स्थिती, कार्यपातळी आणि गुणवत्ता मापदंड तिला ज्ञात असायला हवेत. त्यायोगे तिची निर्णयक्षमता योग्य पातळीवर राहील.

साध्य : स्वजाकृबुला तिचे साध्य किंवा लक्ष्य याची पूर्ण जाणीव असायला हवी. त्यानुसार तिची साध्याच्या दिशेने प्रगती होत आहे की नाही याचे मूल्यांकन करता येईल.

– शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org