भाषा बोलू वा लिहू शकणाऱ्या अनेक यंत्रांनी आपल्या रोजच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. या यंत्रांना भाषा शिक्षण देणाऱ्या नैसर्गिक भाषा प्रक्रियेमुळेच (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) हे शक्य झाले आहे. त्यामुळेच सिरी, अॅलेक्सासारखे बोलके यंत्रसाहाय्यक अनेक घरांत वापरले जातात. ते आवडीची गाणी ऐकवणे, गजर लावणे, रेल्वेचे वेळापत्रक सांगणे, तिकिटे आरक्षित करणे अशी विविध कामे आपण मौखिक पद्धतीने सांगताक्षणी करतात.

अनेक प्रकारचे चॅटबॉट्स ग्राहकांच्या प्रश्नांची तत्परतेने उत्तरे देण्याचे काम करतात. काही चॅटबॉट्स फक्त ठरावीक कळीचे शब्दच समजू शकतात तर काही माणसांसारखे संवाद साधू शकतात. चॅटबॉट्स हे नैसर्गिक भाषा प्रक्रिया तंत्राबरोबरच यंत्रांचे स्वयंशिक्षण (मशीन लर्निंग) तंत्राचाही वापर करतात; अनुभवातून स्वत:मध्ये सुधारणा घडवू शकतात.

Loksatta kutuhal Weather forecasting and artificial intelligence
कुतूहल: हवामानाचा अंदाज व कृत्रिम बुद्धिमत्ता
loksatta kutuhal hans moravec important contributions to artificial intelligence and robotics
कुतूहल : हॅन्स मोरोवेक
loksatta kutuhal artificial intelligence in school bus
कुतूहल : शाळेची बस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
loksatta kutuhal evaluation of artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने मूल्यमापन
AI teacher
कुतूहल: यंत्रमानव शिक्षक होतात तेव्हा…
Loksatta kutuhal Artificial Intelligence in Education
कुतूहल: शिक्षणक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता
Kutuhal Artificial intelligence and surgery
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शस्त्रक्रिया
Loksatta kutuhal Artificial intelligence and health research
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यविषयक संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for medical diagnostics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोगनिदान चाचण्या

हेही वाचा >>> कुतूहल : यंत्रांचे भाषापटुत्व

याच प्रगतीमुळे येणाऱ्या ई-मेल्स समजून, त्यांचे वर्गीकरण करून जाहिरातबाजीच्या ई-मेल्स या स्पॅममधे पाठवल्या जातात. फक्त महत्त्वाच्या ई-मेल्सवर आपले लक्ष केंद्रित होते आणि वेळ व श्रम वाचतात. व्यावसायिक पत्रव्यवहार करताना शब्दरचना बिनचूक, प्रभावी व मुद्देसूद असणे गरजेचे असते.

संगणकातील स्पेलचेक यंत्रणा शुद्धलेखनाच्या चुका सुधारते तर ग्रामरली सारखे सॉफ्टवेअर व्याकरणाच्या चुका सुधारते. अधिक समर्पक शब्द सुचवण्याची यंत्रणाही उपलब्ध असते. चॅट जीपीटी सारखे सॉफ्टवेअर तर पूर्ण पत्राचा मसुदाही आपल्याला लिहून देऊ शकते. ही सर्व जादुई नैसर्गिक भाषा प्रक्रियेचीच करामत आहे.

इंटरनेटवर माहितीचा प्रचंड महासागरच उपलब्ध आहे. त्यातून नेमकी माहिती शोधण्याकरिता योग्य कळीचे शब्द वापरणे गरजेचे आहे, पण कळीचे शब्द अपुरे वा थोडे चुकीचे असले तरी वापरणाऱ्याचा हेतू ताडून त्याला हवी असणारी संभाव्य माहिती पुरवण्याचा प्रयत्न आधुनिक सर्च इंजिन्स करतात. उदाहरणार्थ गेम असा कळीचा शब्द दिल्यावर गेम ऑफ लाइफ, गेम थिअरी असे पर्याय आपोआप समोर येतात. दिलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थाचा शोध घेणारी ही प्रभावी यंत्रणा नैसर्गिक भाषा प्रक्रियेमुळेच शक्य झाली आहे. संपर्क माध्यमांवरील विदाचे विश्लेषण करून ग्राहकांची आवड, अपेक्षा जाणून घेणे व त्याप्रमाणे ग्राहकसेवेत सुधारणा घडवणेही आता शक्य होत आहे. वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात घडून येणारी ही क्रांती हे नैसर्गिक भाषा प्रक्रियेचेच फल आहे.