बिहारमध्ये पहिली विधानसभा निवडणूक स्वतंत्र भारतात १९५२ साली झाली. तेव्हा बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ३३१ होती. कालांतराने त्यात बदल होऊन आता ती २४३ इतकी आहे.
बिहारमध्ये १९५२ साली लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसा निवडणुकाही पार पडल्या. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे श्रीकृष्ण सिन्हा हे स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत विजय मिळवून बिहारचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत डॉ. अनुराग नारायण हे उपमुख्यमंत्री झाले.
संयुक्त जनता दलचे प्रमुख नितीश कुमार हे सर्वाधिक काळ बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे तीन कार्यकाळ मिळून एकूण १९ वर्षांहून अधिक काळ त्यांनी पूर्ण केला आहे.
भारतात स्वीकारण्यात आलेल्या लोकशाहीच्या प्रातिनिधिक संघराज्य स्वरूपानुसार केंद्रात लोकसभेत लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खासदार म्हणून बसतात, तर राज्यात अशाच प्रकारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत बसतात. राज्य विधिमंडळात विधानपरिषद हे वरीष्ठ सभागृह तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह मानलं जातं.