scorecardresearch

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२५ वेळापत्रक

दर पाच वर्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबरच हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होतं. ९० आमदारांच्या या विधानसभेची यंदाची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असल्यामुळे त्यानुसार निवडणूक आयोगानं या राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, हरियाणामध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. १ ऑक्टोबर २०२४ रोजी संपूर्ण हरियाणात मतदान पार पडेल.

Election Schedule 2025

Phase 1

Polling
05
Oct 2025

Counting
08
Oct 2024

No of ACs
90

Announcement & Issue of Press Note
16 Aug 2024
Issue of Notification
05 Sep 2024
Last Date for filing Nominations
12 Sep 2024
Scrutiny of Nominations
13 Sep 2024
Last date for withdrawal of Candidature
16 Sep 2024
Date before which the election shall be Completed
08 Oct 2024

Phase 1 Constituency list

५ सप्टेंबर रोजी नोटिफिकेशन जारी केलं जाणार असून अर्जांची छाननी १३ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी मतदानानंतर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ६ ऑक्टोबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असेल. ऑक्टोबर २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्षाच्या युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं आणि मनोहरलाल खट्टर भाजपाचे मुख्यमंत्री झाले. पण जननाय पक्ष सत्तेतून बाहेर पडला आणि सरकार कोसळलं. नंतर अपक्षांच्या पाठिंब्यावर नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Bihar Election Poll 2025 Dates and Schedule: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केल्यानुसार यावेळी बिहारची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडेल. ६ नोव्हेंबर (गुरुवार) व ११ नोव्हेंबर (मंगळवार) रोजी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवली जाईल. १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. १६ नोव्हेंबरआधी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

अशी पार पडेल निवडणूक…

पहिल्या टप्प्यासाठी १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर, दुसऱ्या टप्प्यासाठी १३ ते २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल, तर २१ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी पार पडेल. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० ऑक्टोबर तर, दुसऱ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्यासाठी २३ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “आम्ही बिहारच्या राजकारण सक्रीय असलेल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्या सूचना घेतल्या आणि निवडणुकीचा आराखडा तयार केला आहे. आम्ही बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो की यावेळी बिहारची निवडणूक केवळ बिहारमधील मतदारांसाठीच सोपी नसेल तर अधिकाऱ्यांसाठी देखील सुलभ असेल. कायदा व सुव्यवस्थेवर पूर्ण लक्ष ठेवलं जाईल. यावेळची निवडणूक ही पूर्णपणे पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पडेल.”

बिहारमध्ये ४० जागा राखीव

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यापैकी २०३ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर, ३८ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव आहेत.

बिहारमध्ये ७.४३ कोटी मतदार

बिहार राज्यात ७.४३ कोटी मतदार असून यामध्ये ३.८२ कोटी पुरुष व ३.५० कोटी महिला मतदार आहेत. यासह १७२५ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी ४ लाख मतदारांचं वय ८५ पेक्षा जास्त आहे. राज्यात १४.०१ लाख नवमतदार असून १.६३ कोटी मतदार २० ते २८ वर्षे वयोगटातील आहेत.