आयपीएलच्या या हंगामात हैदराबादच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत प्रतिस्पर्धी संघांना कमी धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले. सोमवारी देखील त्याची पुनरावृत्ती झाली.
सोमवारी सनरायझर्स हैदराबादने बंगळुरुचा पाच धावांनी पराभव करत गुणतालिकेतील अव्वल स्थान कामय राखले. तर बंगळुरुचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आणले.