Maharashtra Political News, 09 November 2023: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पक्षफुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेनेबाबत तर ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घ्यायचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी असून त्याअनुषंगाने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकारमधील मंत्र्यांमध्येच विसंवाद असल्याचं पाहायला मिळत आहे.
Mumbai Maharashtra News Updates: महाराष्ट्राच्या सर्व राजकीय घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
सुषमा अंधारेंचा नितेश राणेंना टोला!
"बालिश बहू वायफळ बडबडला"https://t.co/XyoIskbzI4
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 9, 2023
देवेंद्रजींच्या शूटिंग ब्रिगेड मधल्या एकाने चॅनल वरून असू पळ काढला.. #Barkingbrigade @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @OfficeofUT @
विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाच्या काळात प्रदूषण करणारे फटाके न फोडण्याचा संकल्प सोडला आहे.
यवतमाळ: नागपूर-तुळजापूर महामार्गावरील मांगुळ (ता. यवतमाळ) येथे जंगलात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांना पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई आर्णी पोलिसांनी केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
या पावसाचा परिणाम पावसाळ्यानंतर पेरण्या करण्यात आलेल्या इतर पिकांवरही झाला आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, पडसे तसेच खोकल्याने हैराण असलेल्या रहिवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे.
एकनाथ खडसेंनी प्रकृतीविषयी दिली माहिती
मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2023
प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा… pic.twitter.com/wVDfimWoJx
मुंबईः मालमत्तेच्या खरेदीच्या व्यवहारात १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गोव्यात दाखल झाले आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांत संजय राऊत कुणाला चांगलं म्हटले आहेत का? त्यांना सोडून बाकी सगळे वाईट दिसतात त्यांना. बाकी सगळ्यांकडे ते संशयाच्या नजरेतून बघतात. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं या मराठी म्हणीप्रमाणे त्यांचं आहे. विश्वज्ञानी आपण एकटेच आहोत ही संजय राऊतांची मानसिकता आहे – शंभूराज देसाई
आज आयोगासमोरच्या सुनावणीत पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांचा विचार प्रामुख्याने होणार आहे. निकाल काय लागेल याचा अंदाज जरी करता येत नसला, तरी यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय, त्याचाच कित्ता गिरवला जातो की निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात आणखी मुदत मागितली जाते हेदेखील बघणं महत्त्वाचं असेल – उज्ज्वल निकम
मुंबई: मुंबईमधील खालावणारी हवेची गुणवत्ता आणि वाढते प्रदूषण याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
डोंबिवली: खच्चून भरलेल्या लोकल गाड्यांमुळे डब्यात चढणे मुश्किल होत असल्याने अनेक तरूण प्रवासी जीव धोक्यात घालून मागील काही दिवसांपासून लोकल नियंत्रणाची सयंत्र असलेल्या बंद डब्या जवळील दरवाजा, पायऱ्यांवर लोंबकळत प्रवास करत आहेत.
वर्धा: महापुरुषांच्या विचाराने महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. त्यांनी त्यांच्या काळात कौशल्य विकासाचे तंत्र विकसित केले होते. कौशल्य विषयक या अप्रतिम ध्येय धोरणांची आजच्या तरुण पिढीला ओळख होणे गरजेचे असल्याचे राज्याच्या कौशल्य , रोजगार, नाविन्यता विभागाचे प्रतिपादन आहे.
बुलढाणा: गिट्टी खदानित कार्यरत मूळ मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या मजुराचा गिट्टी च्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. खामगाव येथे ही दुर्देवी घटना घडली.
नाशिक: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या दर्जेदार, आकर्षक वस्तू नागरिकांसाठी विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. दिवाळी मेळावा प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाले.
पुणे : खासगी कर्ज कंपन्यांकडून रिक्षाचालकांचा छळ सुरू आहे. करोना काळामध्ये थकलेले हप्ते बांधून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. खासगी कर्ज कंपन्यांची कर्जे सार्वजनिक बँकांमध्ये वर्ग करण्याची मागणीही पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे रिक्षाचालक यंदा काळी दिवाळी पाळणार असून, उद्या (ता.९) लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
मुंबईः वांद्रे येथील एका शाळेतील शिपायाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर मंगळवारी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.
कोणताही वाद मंत्रिमंडळात झालेला नाही. ही चुकीची माहिती आहे. फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी सामंजस्याने बोलावं अशा सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. एकमेकांवर धावून वगैरे गेल्याचं जर संजय राऊतांनी सिद्ध करून दाखवलं, तर आम्ही मंत्रीपदाचे राजीनामे देऊ – हसन मुश्रीफ
मालेगाव: शिक्षण विभागाच्या चौकशीत नियमबाह्य भरती प्रक्रिया राबविल्याचे स्पष्ट झाल्याने महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या शिक्षण संस्थांच्या विश्वस्तांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात पालकमंत्री दादा भुसे यांचे षडयंत्र असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मुंबई: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनिमित्त घराघरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनीही दिवाळीनिमित्त रस्ते, गल्ली, नाके आणि चौकाचौकात कंदील लावण्याची लगबग सुरू केली आहे.
सुषमा अंघारेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 9, 2023
कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड @Dev_Fadnavis @ShivsenaUBTComm pic.twitter.com/kJpnRhBJSl
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार – रवींद्र धंगेकर
१५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू होईल. असे महाराष्ट्र दौऱ्याचे सहा टप्पे होणार आहेत. १ डिसेंबरपासून महाराष्ट्रात एकही गाव असं राहणार नाही जिथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण चालू नसेल. आत्तापासूनच त्याची तयारी चालू करा – मनोज जरांगे पाटील
नाशिक: दिवाळीत सलग ११ ते १३ दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. निर्यात शुल्कामुळे व्यापाऱ्यांनी यापूर्वीच अनेक दिवस लिलाव बंद ठेवले होते.
२४ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही. जरांगे पाटलांनी २४ डिसेंबरची मुदत सरकारला दिली आहे. मुंबईचं नाक बंद करू, हा जरांगे पाटलांनी दिलेला इशारा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतला नाही तर देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल – संजय राऊत
ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावर मंत्रालयात गँगवॉर चालू आहे. मला वाटतंय या वादात एखादा मंत्री यात मारही खाईल. आम्हाला कळतंय की हे मंत्री एकमेकांवर धावून जात आहेत. आणि यावर मुख्यमंत्र्यांचं कोणतंच नियंत्रण नाहीये. छगन भुजबळ, शंभूराज देसाई यांच्यात विसंवाद आहे. या राज्यात अशी स्थिती कधीच दिसली नाही – संजय राऊत
जर कुठल्या राजकीय व्यक्तीमध्ये ही कला असेल, तर गायला पाहिजे. ते माणूस नाही का? त्यांच्यात कला आहे. त्यांच्या पत्नीही गातात. आम्ही राजकीय विरोधक नक्कीच आहोत. पण जर देवेंद्र फडणवीस चांगलं गाणं गात असतील, तर नक्कीच आम्ही एक ऑल पार्टी ऑर्केस्ट्रा ठेवू आणि त्यांचं गाणं त्यात ठेवू. देवेंद्र फडणवीस चांगलं गातात हे आम्हाला माहिती आहे – संजय राऊत
जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथे ईडी, निवडणूक आयोग जास्त सक्रीय असणारच. जर निवडणूक आयोग घटनात्मक मर्यादांचं पालन करत असता, तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या हाती गेली नसती. त्यामुळे राष्ट्रपती, निवडणूक आयोग यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आता फक्त एकच आशा आहे, देशाचं सर्वोच्च न्यायालय… – संजय राऊत
महाराष्ट्र न्यूज (फोटो -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Mumbai Maharashtra News Updates: मुंबईसह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या