मुंबईः वांद्रे येथील एका शाळेतील शिपायाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर मंगळवारी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी ३३ वर्षीय शिपायाला अटक करण्यात आली.

वांद्रे परिसरातील एका शाळेमध्ये हा प्रकार घडला. तक्रारीनुसार २ ते ७ नोव्हेंबर या काळात आरोपीने पाच मुलींना पहिल्या सहामाही परीक्षेचे पेपर देताना आक्षेपार्ह संभाषण केले. तसेच त्याने मोबाइलद्वारे दूरध्वनी करून, तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे या मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच संभाषण करताना दुहेरी अर्थांच्या शब्दांचा वापर करून तो बोलत होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तात्काळ विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

हेही वाचा… भाजपचे सर्वाधिक कंदील, मनसेचा दीपोत्सव, शिंदे गटाचेही कंदील वाढले; मुंबईत राजकीय आकाशकंदिलांचा झगमगाट

पीडित मुली १५ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. आरोपीच्या गैरवर्तनाचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणही पोलिसांना प्राप्त झाले असून त्याच्या आधारावर मंगळवारी पोलिसांनी घटनास्थळावरून ३३ वर्षीय आरोपीला अटक केली. अटक आरोपी भाईंदर येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसून आरोपीने अशा प्रकारे इतर मुलींचीही छेडछाड केली आहे का ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पीडित मुलींनी याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.