मुंबई: मुंबईमधील खालावणारी हवेची गुणवत्ता आणि वाढते प्रदूषण याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. मुंबईमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक तेवढे वृक्षारोपण करण्यात येत नाही. मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या कामा रुग्णालयामध्ये दुसरे मियावाकी वन फुलविण्यात येत आहे. कामा रुग्णालयाच्या आवारातील तब्बल ७ हजार चौरस फूट जागेवर मियावाकी वन उभे राहात असून, त्यामध्ये विविध ४५ प्रकारची १५०० झाडे लावण्यात येत आहेत.

विकासाच्या नावाखाली मुंबईमध्ये होत असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. परिणामी, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने उपाययोजन करण्याबरोबरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र प्रदूषण रोखण्यामध्ये वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कामा रुग्णालयामध्ये दुसरे मियावाकी वन उभारण्यात येत आहे. हे मियावाकी वन ग्लेनमार्क फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या वनामध्ये अडुळसा, आवळा, दालचिनी, हिरडा, बदाम, फणस, कडीपत्ता, आंबा, कोकम, नागचाफा, करवंद, पिंपळ, शमी, सीता अशोक, सोनचाफा, सुपारी, तेजपत्ता, वड, रिठा, पारिजात, निरगुंडी आदी ४५ प्रजातींची १५०० देशी आणि आयुर्वेदिक गुण असलेली झाडे लावण्यात येत आहेत.

Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

हेही वाचा… मुंबईः पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळेच्या शिपायाला अटक

हे वन ७ हजार स्क्वेअर फूट जागेवर उभारण्यात येत आहे. या मियावाकी वनाची काळजी घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून माळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वनातील झाडांची निगा राखणे, त्यांना खते घालणे याचप्रमाणे झाडांना दिवसांतून दोन वेळा पाणी घालण्यात येत आहे. झाडांना योग्य पाणीपुरवठ्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. मियावाकी उद्यानात झाडांना घालणाऱ्या पाण्यांचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी झाडांभोवती प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे. या उद्यानाच्या देखभालीसाठी संस्थेकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येत असून, ते झाडांच्या जोपासनेवर लक्ष ठेवणार आहेत, अशी माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

पहिले मियावाकी उद्यान १५ हजार स्क्वेअर फूट जागेवर

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २०२२ मध्ये कामा रुग्णालयाच्या आवारात १५ हजार चौरस फूट जागेवर मियावाकी पद्धतीने वन साकारण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ७०२६ झाडे लावण्यात आली आहेत. मियावाकी वनात जैवविविधतता राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या झाडांचा समावेश आहे. या वनामुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायूची निर्मिती व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदुषणाला प्रतिबंध करण्यासाठी झाडांची भूमिका महत्त्वाची आहे. शहरात झाडांची संख्या कमी असल्याने रुग्णालयाच्या आवारात मियावाकी वनाच्या माध्यमातून झाडे लावण्यात येत आहेत. – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय