-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे तेजस्विनी पंडती.
-
तेजस्विनी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती बऱ्याच वेळा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
या फोटोंमुळे तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला होता.
-
पण तेजस्विनी देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते.
-
नुकताच तेजस्विनीने 'ई टाइम्स'ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीमध्ये तिने तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले असून 'मराठी अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करु शकत नाहीत का?' असा प्रश्न विचारला आहे.
-
'मराठी अभिनेत्रींना त्यांनी कसे कपडे परिधान केले आहेत यावरुन जज केले जाते. मी या गोष्टीच्या नेहमी विरोधात असते. जर तुमच्याकडे काही चांगले बोलायला नसेल तर काहीच बोलू नका' असे तेजस्विनी म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, 'तुम्हाला माहिती नसते एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे. मराठी अभिनेत्रीने जर तिचा बोल्ड फोटो शेअर केला तर त्यात चूकीचे काय आहे हे मला समजत नाही. मराठी अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करु शकत नाही का?'
-
'जर एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीने बोल्ड फोटो शेअर केला तर ट्रोलर्स तू खूप छान दिसत आहेस, फोटो छान आहे अशी कमेंट करतील. हिच गोष्ट जर आम्ही केली तर त्यात चुकीचे काय आहे. आम्ही देखील अभिनेत्री आहेत. आम्ही आमचे काम करतो' असे म्हणत संताप व्यक्त करत तेजस्विनीने ट्रोलर्सला सुनावले आहे.

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर