-
“माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे” या वक्तव्यामुळे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) वादात सापडली आहे.
-
भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देव याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर तिने माफी मागत प्रकरणावर पडदा टाकला आहे.
-
श्वेता तिवारी नुकतंच आपली आगामी बेव सीरिज ‘शो स्टॉपर’च्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये आली होती. यावेळी मंचावर तिने “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”, असे वक्तव्य केले. त्यानंतर सर्वत्र गदारोळ सुरु झाला.
-
या संपूर्ण प्रकरणानंतर श्वेता तिवारीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” असे तिने यावेळी म्हटले.
-
मात्र श्वेता अशाप्रकारे वादात अडकल्याची ही काही पहिली वेळ नाही. तशी श्वेता ही तिच्या मालिकांपेक्षा सोशल मीडियावरील फोटोंमुळे अधिक चर्चेत असते.
-
श्वेताने पोस्ट केलेले बोल्ड फोट सोशल नेटवर्किंगवर अनेकदा चर्चेत असतात.
-
श्वेता सोशल मीडियावर फारच सक्रीय असून ती अनेकदा तिच्याबद्दलच्या वादांवर आणि प्रोजेक्ट तसेच फोटोशूटबद्दल इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना अपडेट करत असते.
-
श्वेताच्या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्स असतात.
-
ब्रासंदर्भातील वक्तव्यावरुन झालेल्या वादानंतरही तिने इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला होता.
-
श्वेताने या व्हिडीओदरम्यान एका इंग्रजी गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यात Kiss My A** असे एक वाक्य आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली.
-
अशापद्धतीचं ट्रोलिंग श्वेतासाठी काही नवं नाही.
मध्यंतरी तिने स्वीमींगपूलमधील काही खास फोटो शेअर केले होते. -
तिच्या या स्वीमींगपूल लूकचीही चांगलीच चर्चा सोशल नेटवर्किंगवर झालेली.
-
श्वेताच्या या फोटोंना लाखोच्या संख्येने लाइक्स होते, पण त्याच वेळी तिला ट्रोलही करण्यात आलेलं.
-
इन्स्टाग्रामवर ३४ लाख १४ हजार फॉलोअर्स असणारी श्वेता ही आता सोशल इनफ्ल्यूएन्सर आहे.
-
पण सोशल मीडियावर स्टार होण्याआधी निर्माती एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमुळे श्वेताला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
-
२००१ साली प्रदर्शित झालेल्या एकता कपूरच्या या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
-
ही मालिका यशाच्या शिखरावर होती तेव्हा अनुराग बासू आणि प्रेरणा हे पात्र देशातील घराघरांमध्ये पोहचलेली पात्र ठरली होती.
-
अनुरागची भूमिका साकारणारा सीजेन खान आणि प्रेरणाची भूमिका साकारणाऱ्या श्वेता तिवारीची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
-
सध्या वाद, वेब सिरीज आणि सोशल मीडियामुळे श्वेता चर्तेत असली तरी अनुरागची भूमिका साकारणारा सीजेन खान मात्र फारसा प्रकाशझोतात नसतो.
-
ऑनस्क्रीन जबरदस्त केमिस्ट्री असणाऱ्या या दोघांसंदर्भात मध्यंतरी सीजेन खाननेच एक धक्कादायक खुलासा केलेला.
-
‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका यशस्वी ठरल्यानंतर सीजेन आणि श्वेता यांच्या खऱ्या आयुष्यातील नात्याबद्दलही फारच चर्चा झाल्याचं पहायला मिळालं.
-
दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.सीजेन आणि श्वेताने यासंदर्भात कधीच कोणतं स्पष्टीकरण दिलं नाही.
-
सीजेनने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्वेता सोबतच्या या नात्यांबद्दल भाष्य केलं होतं.
-
श्वेता तिवारी आता माझ्या संपर्कातही नसल्याचं यावेळी सीजेन म्हणाला होता.
-
ती आता माझी मैत्रीणही नसल्याचा खुलासा सीजेन केला होता.
-
“सध्या मला तिच्याशी काही देणं घेणं नाहीय. ती माझी कोणीच लागत नाही. मला तिच्या असण्या नसण्याचा फरक पडत नाही,” असं सीजेन श्वेताबद्दल बोलताना म्हणाला.
-
तसेच “तिच्याप्रमाणे मी माझ्या आयुष्यात इतर कोणालाही पाहू शकणार नाही. मी तिच्या इतका इतर कोणाच्याही जवळ जाणार नाही,” असं म्हणत सीजेनने श्वेतासोबतचे संबंध कायमचे संपुष्टात आल्याचे संकेत दिले.
-
श्वेता तिवारी आणि सीजेन खान या दोघांमधील नातं पहिल्या काही वर्षांनंतर फारच बिघडलं. त्यानंतरही ते प्रोफेश्नल कमिटमेंट म्हणून एकत्र मालिका करत होते.
-
याचसंदर्भात बोलताना सीजेन म्हणतो, “आम्ही दोघेही फार प्रोफेश्नल होतो. कसोटी जिंदगी की मालिका माझ्यासाठी तेवढीच महत्वाची होती जेवढी श्वेतासाठी होती.”
-
“आम्ही दोघे एकत्र आमचे आमचे सीन शूट करायचो आणि दिग्दर्शकाने कट असं म्हणताच आम्ही आमच्या आमच्या जागी जाऊन बसायचो,” असं सीजेन सांगतो.
-
“आम्ही दोघेही ही गोष्ट फार छान पद्धतीने शिकलो होतो. आम्ही दोघेही रोबोट झालो होतो,” असं सीजेन नात्यामध्ये आलेल्या दुराव्याबद्दल बोलताना म्हणाला होता.
-
मालिकेदरम्यानच दोघांच्या नात्यात फूट पडल्याचं सीजेनने सांगितलं.
-
हे दोघेही त्यानंतर पुन्हा कधी एकत्र आलेच नाहीत.
-
श्वेता आणि सीजेनमधील संबंध या लोकप्रिय मालिकेच्या चित्रिकरणादरम्यानच अगदी कमालीचे ताणले गेले.
-
‘इंडिया फोरम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीजेनने, “श्वेता तिवारी ही माझी पहिली आणि शेवटी चूक होती. मी याशिवाय आणखीन काहीच बोलू इच्छित नाही,” असं त्याने म्हटलं होतं.

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”