-
दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हा सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
-
‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही’, असे वक्तव्य किच्चा सुदीपने केले. त्याच्या विधानामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला.
-
त्याच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने किच्चा सुदीपवर निशाणा साधला होता.
-
एकीकडे त्याच्यावर टीका होत असली तरी दुसरीकडे टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी किच्चा सुदीपचे समर्थन केले होते.
-
या मुद्द्यावरुन सध्या अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात ट्विटर वॉर सुरु होते.
-
या संपूर्ण प्रकरणानंतर किच्चा सुदीप नक्की कोण? याची आपण माहिती घेणार आहोत.
-
किच्चा सुदीपचे याचे खरे नाव सुदीप संजीव असे आहे. मात्र सिनेसृष्टीत त्याला सुदीप याच नावाने ओळखले जाते.
-
किच्चा सुदीप हा कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार मानला जातो. तो कन्नड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि सूत्रसंचालकही आहे.
-
किच्चा सुदीपने आतापर्यंत अनेक कन्नड भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच तो तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्येही झळकला आहे.
-
सलमान खानच्या ‘दबंग 3’, ‘फुंक’, ‘रन’, ‘फुंक 2’, ‘रक्तचरित्र 1’ आणि ‘रक्तचरित्र 2’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटात त्याने काम केले आहे.
-
किच्चा सुदीप याचा जन्म कर्नाटकातील शिमोगा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संजीव मंजप्पा आणि आईचे नाव सरोजा असे आहे.
-
किच्चाला सिनेसृष्टीत येण्याआधी इंजिनियर व्हायचे होते. त्याने बंगळूरुमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे.
-
पण त्यानंतर त्याला अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली आणि तो मुंबईत आला. त्यानंतर त्याने अभिनय शाळेत प्रवेश घेतला.
-
किच्चा सुदीपने १९९७ मध्ये ‘थयव्वा’ या कन्नड चित्रपट आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
अनेक कन्नड चित्रपट केल्यानंतर २००८ मध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या ‘फूंक’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
गेल्या २० वर्षांपासून किच्चा हा सिनेसृष्टीत कार्यरत आहे. लवकरच तो ‘विक्रांत राणा’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हुच्छा’ या चित्रपटामुळे किच्चाला खरी ओळख मिळाली. या चित्रपटामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला.
-
या चित्रपटानंतरच सुदीपला ‘किच्चा’ हे टोपणनाव मिळाले.
-
यानंतर त्याने एसएस राजामौली यांच्या ‘ईगा’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली. त्याची ही भूमिकाही प्रचंड गाजली.
-
किच्चा सुदीप हा बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा खूप चांगला मित्र आहे.
-
‘दबंग ३’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी सलमानकडून एक रुपयाही मानधन आकारले नव्हते, एका मुलाखतीत त्याने याबाबतची माहिती दिली होती.
-
सलमान आणि किच्चाचे कुटुंबिय यांच्यात फार जवळचे आणि घनिष्ठ संबंध आहेत.
-
सलमानने काही वर्षांपूर्वी त्याला दीड कोटींची आलिशान कारही भेट दिली होती.
-
किच्चा सुदीपने हा अभिनेत्यासोबतच उत्तम दिग्दर्शकही आहे. त्याने आतापर्यंत अनेक कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
-
त्याचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
-
त्याचे स्वत:चे ‘किच्चा प्रॉडक्शन’ नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या बॅनरखाली त्याने अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
त्यासोबत त्याने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. कन्नड भाषेतील बिग बॉसचे सूत्रसंचालन तोच करतो.
-
त्यानंतर २०१३ मध्ये किच्चा सुदीपने ‘३६० डिग्री’ नावाची एक इव्हेंट कंपनी देखील सुरू केली होती.
-
किच्चा सुदीपच्या पत्नीचे नाव प्रिया राधाकृष्ण असे आहे. २००१ मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले.
-
किच्चा सुदीप आणि पत्नी प्रिया २०१५ मध्ये वेगळे झाले होते. पण त्यानंतर सर्व मतभेद विसरून त्यांनी नवीन सुरुवात केली होती.
-
किच्चा सुदीप हा आता जरी वादात सापडला असेल तर तो अनेक सामाजिक काम ही करतो.
-
या संस्थेद्वारे तो गरीब मुलांना शालेय गणवेशापासून ते शिष्यवृत्तीपर्यंतची सुविधा उपलब्ध करुन देतो.
-
त्याच्या या संस्थेने करोना महामारीच्या काळात कन्नड चित्रपट उद्योगातील ज्येष्ठ कलाकार, तंत्रज्ञ आणि इतरांना खूप मदत केली होती. त्यावेळी त्याने आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला होता.

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस