-
अभिनेत्री श्वेता शिंदे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
आता देखील श्वेताने एक खास साडी परिधान करत फोटोशूट केलं.
-
हे फोटो शेअर करत असताना ती अगदी भावूक झाली.
-
यामागचं कारण देखील तसंच होतं. झी मराठीवरील नावाजलेली मालिका ‘लागिरं झालं जी’मध्ये जीजी हे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांनी तिला ही साडी भेट म्हणून दिली होती.
-
दोन वर्षांपूर्वीच कमल यांचं निधन झालं. श्वेता या मालिकेची निर्माती होती. तिचं कमल यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं.
-
या साडीमध्ये श्वेताला पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ती इच्छा अपूर्णच राहिली.
-
आज जेव्हा श्वेताने कमल यांनी भेट दिलेली साडी परिधान करत फोटोशूट केलं तेव्हा ती अगदी भावूक झाली.
-
त्यांच्यासाठी श्वेताने खास पोस्ट देखील शेअर केली.
-
श्वेताने नेसलेल्या या साडीची खासियत म्हणजे मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या चेहऱ्याची प्रिंट यावर पाहायला मिळत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”