-    मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. यातला तिचा लूक अगदीच खास आहे. (सर्व फोटो-स्पृहा जोशी, इंस्टाग्राम पेज) 
-    स्पृहा इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे, तिच्या फोटोंवर कायमच लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. 
-    स्पृहा जोशी तिच्या सुख कळले या सीरियलमुळे चर्चेत आहे. तसंच तिचा शक्तिमान हा सिनेमाही याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 
-    स्पृहा ही मूळची मुंबईची. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. टिपिकल दादरकर. तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर या शाळेत झालं आणि तिथेच तिला तिच्यातील अभिनय, लेखन, वक्तृत्व हे सूप्तगुण गवसले. 
-    स्पृहा दुसरीत होती तेव्हा तिने तिचं पहिलं बालनाट्य केलं होतं ज्याचं नाव होतं ‘दिनूचं बिल.’ हे नाटक विद्याताई पटवर्धन यांनी बसवलं होतं आणि त्यात त्यांनी स्पृहाला प्रमुख भूमिका दिली होती. 
-    स्पृहाने नाटक, सिनेमा, वेब सीरिज अशा सगळ्याच माध्यमांमध्ये काम केलं आहे. एका लग्नाची तिसरी गोष्टमधली तिने साकारलेली इशा अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. 
-    स्पृहा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिने तिचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. ‘चांदणचुरा’ असं या तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाचं नाव. 
-    २०१६ मध्ये तिने तिचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित केला ज्याचं नाव ‘लोपामुद्रा’. या कवितासंग्रहात दुसऱ्यांसाठी झटताना ज्या स्त्रियांची मुद्रा लोप पावलेली आहे त्यांचं चित्रण तिने तिच्या कवितांमधून केलं आहे. 
-    २०११ मध्ये स्पृहाने तिचा ‘स्पृहा जोशी’ हा यूट्यूब चॅनल सुरू केला. सुरुवातीला ती त्यावर फारशी सक्रिय नव्हती. पण २०१७-१०१८पासून ती त्यावर सक्रियपणे तिच्या कविता चाहत्यांना ऐकवू लागली. 
-    एक कवयित्री, अभिनेत्री म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही कमी नाही. तिचे फोटो पाहून चाहते अनेकदा सुख कळले असंही म्हणतात. 

 
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  