-
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी येऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवारची तिचाच मित्र राहुल हंडोरेने हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
आरोपीने स्वतः पोलीस तपासात त्याने दर्शनाचा खून केल्याची कबुली दिली आहे.
-
पुणे पोलिसांनी गुरुवारी (२२ जून) पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाची माहिती दिली.
-
विशेष म्हणजे यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अहमदनगरमधील पीडित दर्शना पवार आणि नाशिकचा आरोपी राहुल हंडोरे लहानपणापासून ओळखत असल्याचं सांगितलं.
-
तसेच दोन स्वतंत्र जिल्ह्यातील असूनही ते दोघे लहानपणापासून एकमेकांना कसे ओळखत होते हेही नमूद केलं.
-
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्येप्रकरणात नेमकं काय म्हटलं त्याचा हा आढावा…
-
दर्शना आणि राहुल दोघांची लहानपणापासून ओळख होती – अंकित गोयल
-
दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर होतं – अंकित गोयल
-
त्यामुळे दोघांची लहानपणापासून ओळख होती – अंकित गोयल
-
दोघांचं प्रेमप्रकरण होतं की नाही हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल – अंकित गोयल
-
आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही – अंकित गोयल
-
मात्र, प्राथमिक तपासात असं दिसतंय की, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला – अंकित गोयल
-
दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपीला राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचं होतं – अंकित गोयल
-
दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे – अंकित गोयल
-
दर्शनाप्रमाणे आरोपी राहुल हंडोरेही पुण्यात एमपीएससीची तयारी करत होता – अंकित गोयल
-
तो गेल्या काही वर्षांपासून अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याने वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या आहेत – अंकित गोयल
-
सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता आणि एका रुममध्ये रहात होता – अंकित गोयल
-
दर्शना आणि आरोपी राहुल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते का, ब्रेक अप झालं का याविषयी आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही – अंकित गोयल
-
त्यांची आधीपासून ओळख होती एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो – अंकित गोयल
-
सखोल चौकशीनंतरच त्यांचं प्रेम प्रकरण होतं की नाही हे समजू शकेल – अंकित गोयल
-
आरोपी आणि पीडित मुलगी हे नातेवाईक नाहीत – अंकित गोयल (सर्व छायाचित्र – संग्रहित व लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शेतकऱ्याचा नाद नाय! तब्बल ५ एकरवर बांधलं जबरदस्त शेततळं; VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की