-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी नवीन नियुक्त्या केल्या केल्या आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली आहे.
-
इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली आहे.
-
दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कोणतीच नवीन जबाबदारी दिली नाही.
-
सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही सुरू आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
-
कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे- अजित पवार
-
या निर्णयामुळे मी अतिशय समाधानी आहे. मला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे- अजित पवार
-
माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. मी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतोय- अजित पवार
-
राज्य पातळीवरचे प्रश्न मला विचारा आणि राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न तुम्ही आमचे राष्ट्रीय प्रवक्ते किंवा राष्ट्रीय नेत्यांना विचारा, असं मी नेहमीच सांगत आलो आहे- अजित पवार
-
आम्ही एक समिती गठीत केली होती. त्या समितीत १५ ते १७ लोक होते. त्यावेळी आम्ही दोन निर्णय घेतले होते- अजित पवार
-
पहिला निर्णय म्हणजे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा- अजित पवार
-
दुसरा निर्णय म्हणजे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची नियुक्ती करावी, हे मी स्वत: सुचवलं होतं-अजित पवार

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक