कंगना रणौतचं वक्तव्य; “ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान मोदींनी या मोहिमेला दिलं कारण…”
भारताने पाकव्याप्त जम्मू काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने लष्कराच्या यशाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे विदेश दौरे पुढे ढकलल्या आहेत. ८ मे रोजी केंद्र सरकारने सर्व पक्षांना या मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी बैठक बोलावली आहे.