अभिनेत्याच्या २५ वर्षीय मुलाने अभिनेत्रीशी केलं लग्न, सोहळ्याला सुनील शेट्टीने लावली हजेरी
'महाभारत' मालिकेत दुर्योधनची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सर यांच्या मुलगा सिद्धांत इस्सरने सहकलाकार सुरभी शुक्लाशी लग्न केले. २५ वर्षीय सिद्धांतच्या लग्नाला मोजके पाहुणे उपस्थित होते. मुकेश खन्ना आणि सुनील शेट्टी यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला. 'शैतानी रस्में' शोच्या सेटवर भेटलेल्या सिद्धांत आणि सुरभीने प्रेमात पडून लग्नाचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा आहे.