scorecardresearch

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
ramdas patil quits ncp nanded ajit pawar visit congress join
रामदास पाटील यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम! अजित पवार यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान पक्षामध्ये फूट…

Ramdas Patil Sumthankar, Ajit Pawar NCP : अजित पवार यांचा नांदेड दौरा सुरू असतानाच रामदास पाटील सुमठाणकर यांनी पक्षातील पदाचा…

Digvijay Singh accuses BJP of receiving pharma donations
“भाजपाला औषध कंपन्यांकडून ९४५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स”, कफ सिरपमुळे २६ मुलांच्या मृत्यूनंतर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

BJP Receives Rs 945 Crore Electoral Bonds: भोपाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आरोप…

Chief Minister Fadnavis' important statement on the Supreme Court's decision
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वपूर्ण विधान, “न्यायालये सरकारच्या मर्जीतील असल्याचा…”

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेस सरकारवर नव्हे तर संविधानिक संस्थांवर हल्ला करत आहे, ज्यामुळे लोकशाहीसाठी धोका निर्माण होतो.

BJP and Shiv Sena literature found under a pile of garbage in Jalgaon
लोकसत्ता वृत्ताची दखल… जळगावमधील कचऱ्याच्या ‘त्या’ ढिगाऱ्याखाली भाजप-शिवसेनेचेही साहित्य !

निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यावर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून प्रचार प्रारंभ केला जातो. तत्पूर्वी, प्रचारासाठी लागणाऱ्या विविध साहित्याला या…

nitin gadkari orders removal illegal encroachments kalmeshwar Nagpur BJP Congress Obstruction Project
Nitin Gadkari : भाजप-काँग्रेस भेद न करता अतिक्रमण तोडा; केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आदेश… फ्रीमियम स्टोरी

अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि कोणत्याही पक्षाचा दबाव न घेता करावी, असे निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काँग्रेसच्या माजी खासदाराच्या घरातील सामान बाहेर फेकलं; नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले, “दलितांचा आवाज…”

प्रकरण न्याय प्रविष्ट असताना देखील त्यांच्या कुटुंबीयांना नवी दिल्लीतील त्यांच्या पंडारा पार्क बंगल्यातून बळजबरीने बाहेर काढण्यात आल्याचे उदित राज म्हणाले…

jalgaon district Maha Vikas Aghadi Congress party
Jalgaon Politics : जळगावमध्ये काँग्रेस पक्षाची इतकी वाईट अवस्था नेमकी कशामुळे…?

महाविकास आघाडीतही शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. परंतु,, काँग्रेस पक्षाचे नेमके काय चालले…

Harshwardhan Sapkal target Defender Car case
Video: सत्ताधारी आमदारांना ‘डिफेन्डर’ कार भेट देणारा ठेकेदार कोण? हर्षवर्धन सपकाळ म्हणतात लवकरच महाराष्ट्राला कळेल…

बुलढाण्यातून सुरु झालेला महागाड्या व शाही ‘डिफेन्डर’ वाहनाचा वाद आता राज्यात पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डिफेन्डर वाहनावरून…

vasai Congress party black diwali protest on friday
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी काँग्रेसचे काळी दिवाळी आंदोलन; सरकारला दिली झुणका भाकरीची शिदोरी

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षाकडून काळी दिवाळी आंदोलन पुकारण्यात…

Old enmity resurfaces on Kolhapur's political battlefield; Rajesh Kshirsagar and Satej Patil face to face
कोल्हापूरमध्ये ऐन दिवाळीत राजकीय वादाचे बार

कोल्हापूरमध्ये दिवाळीतही राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय वाद उग्र झाले असून, महापालिकेतील विकासकामे, भ्रष्टाचार आणि काळम्मावाडी योजनेवरील अपुरी…

Chandrapur: Congress district president, women president and youth president are from the same community
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष एकाच समाजातील; इतर समाजांत तीव्र नाराजी

काँग्रेसने माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे, तर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे आहेत आणि आता…

Congress should seriously consider the crisis in Mumbai! -Sanjay Raut
काँग्रेसने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार करावा! मुंबई महापालिकेसाठी संजय राऊत यांच्याकडून काँग्रेसची मनधरणी

मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत ठाकरे…

संबंधित बातम्या