scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (TMC) हा एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव मुख्यत्वे पश्चिम बंगाल या राज्यात आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. सध्या या पक्षाची पश्चिम बंगालमध्ये सरकार आहे. या पक्षाने २०११ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली होती. तृणमूल पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभेत तीन वेळा बहुमत मिळवले आहे आणि २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष आहे.


सुरुवातीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होत वाजपेयी सरकराचा भाग झाला होता. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने ७ जागांवर विजय मिळवला होता. तर १९९९ च्या निवडणुकीत पक्षाने भाजपसह ८ जागांवर विजय मिळवला होता. २००० मध्ये पक्षाने कोलकाता महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत तृणमूल ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला. मात्र २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २००६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तृणमूल पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडली होती.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी ३४ जागांवर विजय मिळवला होता. तसेच पक्षाला पाच वेगवेगळ्या राज्यांमधून ६ टक्के मते मिळाली होती, त्यामुळे हा पक्ष राष्ट्रीय दर्जासाठी देखील पात्र ठरला होता. २ सप्टेंबर २०१६ रोजी निवडणूक आयोगाने तृणमूल पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. २०१६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाची यशाची घोडदौड कायम राहिली. पक्षाने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली. ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु त्यास भाजपकडून फटकाही बसला होता. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ममता बॅनर्जींचा पक्ष निवडून आला आणि तिसऱ्यांदा राज्यात या पक्षाची सरकार स्थापन झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने २९ जागांवर विजय मिळवला होता.


Read More
Vice President election India, Congress, Trinamool Congress comment,
विरोधकांमध्ये मतफुटीवरून तीव्र मतभेद, उपराष्ट्रपतीपद निवडणुकीनंतर आरोपप्रत्यारोप

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, बुधवारी ‘इंडिया’ आघाडीमध्येच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले गेले.

TMC MLA Abdur Rahim Bakhsh
“तुमच्या तोंडात अ‍ॅसिड ओतून…”, तृणमूल आमदाराची भर सभेतून भाजपा नेत्यांना धमकी

Trinamool MLA Abdur Rahim Bakhshi : तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की भाजपाशासित राज्यांमध्ये बंगाली मजुरांवर, प्रामुख्याने मुस्लिमांवर बांगलादेशी घुसखोर…

mamata Banerjee
आंदोलन स्थळ हटवण्यासाठी लष्कर, तृणमूलची केंद्र सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय लष्कर (स्थानिक लष्करी प्राधिकरण, कोलकाता) मैदान परिसरात दोन दिवसांच्या कालावधीसाठी कार्यक्रमांना परवानगी देते.

Cut Amit Shah Head Mahua Moitra Shocker On Infiltration
“अमित शाह यांचे शीर धडापासून वेगळे करा,” महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान; नेमकं काय म्हणाल्या?

Mahua Moitra shocking statements on Amit shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी…

TMC MP Mitali Bagh
“किरेन रिजिजूंनी संसदेत मला मारहाण केली”, तृणमूलच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “दोघांनी हल्ला केला अन्…”

TMC MP Mitali Bagh : खासदार मिताली बाग म्हणाल्या, “आम्ही विधेयकाचा विरोध करत होतो तेव्हा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू…

Mahua Moitra Kalyan Banerjee controversy
खासदारांच्या वादात ‘तृणमूल’कडून खांदेपालट; महुआ मोईत्रा-कल्याण बॅनर्जी वाद नेमका काय?

संसदेत भाजपविरोधाची धार तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बुलंद केली. मात्र अंतर्गत वादात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची कामगिरी अपेक्षित होत नसल्याची पक्ष नेतृत्वाची…

“डुक्कर, स्त्रीद्वेष्टे, भ्रष्ट अन्…”, महुआ मोइत्रा व कल्याण बॅनर्जींमध्ये शाब्दिक युद्ध; तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर

Mahua Moitra vs Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जी म्हणाले, “महुआ मोइत्रा यांनी माझ्याबद्दल बोलताना ज्या शब्दांची निवड केलीय ते शब्द…

Prime Minister Narendra Modi criticizes Trinamool Congress for encouraging infiltration for vote bank politics
मतपेढीच्या राजकारणासाठी घुसखोरीला प्रोत्साहन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तृणमूल काँग्रेसवर टीका

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने मतपेढीच्या राजकारणासाठी घुसखोरीला प्रोत्साहन देऊन बंगाली अस्मिता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली.

West Bengal Chief Minister Mamata Banerjee
Mamata Banerjee: महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही पेटला मातृभाषेचा मुद्दा; ममता बॅनर्जी म्हणाल्या, “तुम्ही बंगाली…”

Mamata Banerjee On Bengali: ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिक लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला.

विनयभंग, शिक्षकांना धमक्या… अशी आहे कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी

kolkata Law college Rape case: २५ जून रोजी दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मोनोजित…

TMC Leader Shot In Bengals Cooch Behar Party Blames BJP
पक्षातील अंतर्गत कलहामुळे नेत्यावर हल्ला, नेमकं प्रकरण काय? भाजपाला या हल्ल्याशी का जोडले जात आहे?

TMC Leader Shot पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात गुरुवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात तृणमूल काँग्रेसचे नेते राजू डे गंभीर जखमी…

आरजी कार नंतर आता लॉ कॉलेज अत्याचार प्रकरण, विरोधी पक्षामुळे ममता सरकारची कोंडी

West Bengal Law college Rape case: ऑगस्ट २०२४ मध्ये आरजी कार इथे झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात…

संबंधित बातम्या