scorecardresearch

तृणमूल काँग्रेस

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) प्रामुख्याने सक्रिय असणाऱ्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाची स्थापना १ जानेवारी १९९८ रोजी झाली. सध्याच्या प. बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. २६ वर्ष कॉंग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र जाण्याचा विचार करत तृणमूल काँग्रेस पक्षाची (TMC) स्थापना केली.

२०१६ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. टीएमसीचे (TMC) लोकसभेमध्ये २३ तर, राज्यसभेमध्ये १३ सदस्य आहेत. तसेच संसदेमध्ये २३० आमदार असलेला हा तिसऱ्या क्रंमाकाचा मोठा पक्ष आहे. जोरा घास फुल (दोन फुलं आणि गवत) हे या पक्षाचे चिन्ह आहे. १९९८च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टीएमसीचे ७ उमेदवार निवडून आले आणि हा पक्ष वाजपेयी सरकारमध्ये सहभागी झाला. पुढे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपसह 8 जागा जिंकल्या. २००० साली कोलकाता महानगरपालिकेवर या पक्षाची सत्ता आली. २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत टीएमसी ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला.

२००४ व २००६ साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेले नुकसान पाहून त्यांनी एनडीए (NDA) सोडण्याचा निर्णय घेतला. बंगालमधील नंदीग्राममध्ये एका प्रकल्पासाठी तब्बल ७०,००० लोकांना स्थलांतर करावे लागणार होते. याला तृणमूल काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला. एकूण प्रकरणाचा फायदा पक्षाला २००९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला. १९ जागा जिंकत ममता बॅनर्जी केंद्रीय रेल्वेमंत्री बनल्या.

२०११ ते २०२१ अशा दहा वर्षांमध्ये सलग विजय मिळवत ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखली आहे. २०२१ च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण शक्ती लावूनही भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही. पण यावेळी त्यांना टीएमसीच्या मुकुल रॉय आणि सुवेंदू अधिकारी अशा मोठ्या नेत्यांना परभूत करण्यात यश मिळाले.
Read More
BJP worker shiv shankar das
‘भाजपा जिंकू दे, तुला घरातून उचलून आणेन’, कार्यकर्त्याची महिलेला धमकी; पोलिसांनी केली अटक

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होत आहे. भाजपा महिलाविरोधी आहे, हे सांगण्याची एकही संधी तृणमूल पक्ष…

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?

१९ एप्रिलला होणारे पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपासाठी महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात अलीपुरद्वार,…

BJP turf Cooch Behar in Bengal
पश्चिम बंगालमधल्या तीन जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या; कूचबिहार कोण जिंकणार?

२०१९ मध्ये पक्षाने या भागातील आठपैकी सात जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी सहा जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.…

jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

७ एप्रिल रोजी कोलकाता येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत टीएमसीचे सरचिटणीस कुणाल घोष व अर्थ राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आरोप…

BJP candidate Khagen Murmu
भाजपा उमेदवाराने प्रचारादरम्यान महिलेचं घेतलं चुंबन; फोटो व्हायरल

पश्चिम बंगालमधील भाजपाचे उमेदवार खगन मुर्मू यांनी प्रचारादरम्यान एका महिलेचे चुंबन घेतले. सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर आता वाद उफाळला आहे.

Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयासमोर धरणे धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या १० खासदारांनी थेट पोलीस ठाण्यात २४ तासांचे ठिय्या आंदोलन पूर्ण केले.

Who is 33 year old Pratikur Rahman
 ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. या जागेवरून ममता यांनी पुन्हा एकदा…

kangana govinda electins entry
9 Photos
Loksabha Election 2024: कंगना, गोविंदा यावर्षी ‘हे’ सिनेक्षेत्रातील कलाकार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात!

छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरील सिनेक्षेत्रातील कलाकार लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत.

Mahua Moitra
उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला.

rachana banerjee hugali loksabha
‘सूर्यवंशम’ अभिनेत्री रचना बॅनर्जींनी लोकसभा जिंकण्यासाठी कसली कंबर; उमेदवारी देण्यामागे ममतादीदींचे गणित काय? प्रीमियम स्टोरी

तृणमूल काँग्रेसने रचना बॅनर्जी यांना हुगळी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर सध्या भाजपा प्रतिनिधित्व करीत आहे. तृणमूलसाठी ही जागा…

yusuf pathan banners
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर युसूफ पठाण बॅकफूटवर; विश्वचषक विजेत्या संघाचा फोटो असलेले बॅनर्स हटवले

युसूफ पठाण पश्चिम बंगालमधील बेहरामपूर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांना तृणमूल काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

संबंधित बातम्या