scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
BJP challenges NCP dominance in sports print politics news
क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला भाजपचे आव्हान, मुख्यमंत्र्याचा विश्वासू रिंगणात

राजकारणासोबतच कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा राजकारणाच्या पलिकडच्या संघटनांवर असणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अग्रस्थानी आहेत, मुंबईतील विविध पक्षाचे…

vaibhav Khedekar
वैभव खेडेकर यांचा अखेर भाजप प्रवेश; मनसेनंतर भाजपात दाखल होत खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवा कलाटणीचा सूर

खेड तालुक्यातील तरुण आणि उत्साही राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले वैभव खेडेकर अखेर भाजपात दाखल झाले आहेत.

shiv sena shinde
शिंदे गटाच्या आमदाराचे बंड… पाचोरा–भडगावमध्ये स्वबळावर निवडणुका लढणार !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती व्हावी म्हणून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील एकीकडे भाजपला गळ घालत आहेत. तर…

Ameet Satam news
महायुतीच्या महापौरांना पंतप्रधानांच्याच ध्येय धोरणानुसार काम करावे लागेल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना केले स्पष्ट

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आधीच महापौर पदावरून भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले आहे. त्यामुळे मुंबईत नक्की काय होणार…

Eknath Shinde latest news,
अमळनेरचे राजकारण फिरले… माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश !

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजप सोडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

BJPs former corporators protest
बेकायदा बांधकामांविरोधात भाजपच्या माजी नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

नौपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्त राव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत बेकायदा बांधकामांवर कारवाईचा आग्रह धरला.

Bachchu Kadu criticized BJP about elecation commication
“भाजपला बिहारपेक्षा मुंबई महत्वाची..”- बच्चू कडूंचा टोला

बच्चू कडू म्हणाले, काँग्रेस इतर राज्यात मराठी विषय घेऊन जाऊ शकत नाही. भाजपला बिहारपेक्षा मुंबई हवी आहे. त्यासाठी भाजपची धडपड…

US President Donald Trump Grand Alliance Government Nashik Guardian Minister Post Dispute
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाशिकच्या राजकारणात ?…दादा भुसे, गिरीश महाजन, छगन भुजबळ यांनाही आशा

महाराष्ट्रातील राजकारणात महायुती सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नाशिकशी संबंधित असलेला एक राजकीय…

Bjp leader and supreme court lawyer Nazia Elahi Khan on lawrence bishnoi
भाजपा नेत्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीला दहशतवादी संघटना घोषित केल्याने संताप; नक्की काय म्हणाल्या?

Bjp leader on Bishnoi gang: भाजपा नेत्या आणि पेशाने सर्वोच्च न्यायालयात वकील असणाऱ्या नाझिया इलाही खान यांनी संताप व्यक्त केला…

Mumbai construction safety audit bjp amit satam demand bmc
सर्व बांधकामांच्या सुरक्षा उपाययोजनांचे ‘ऑडिट’ करा; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची मागणी

जोगेश्वरी पूर्व येथे ८ ऑक्टोबर रोजी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उंचावरून वीट पडल्याने संस्कृती अमीन (२२) हिचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या