scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
sanjay-raut-slams-ajit-pawar-bjp-solapur
भाजपा अजित पवारांना धक्का देणार? ३ माजी आमदार जाण्याच्या चर्चेवर संजय राऊत म्हणाले, “ऐसा कोई सगा नही जिसको…”

सोलापूर जिल्ह्यात मिशन लोटसची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने सावधगिरीची पावले उचलली आहेत. या प्रकारावर आता संजय राऊत…

sanjay-raut-slams-mahesh-kothare
‘मी मोदी भक्त’ म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले, “तात्या विंचू रात्री येऊन…”

Sanjay Raut on Mahesh Kothare: अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना मी…

Mahayuti alliance
पुण्यात महायुतीत ‘एकला चलो’चा संदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एकला चलो’चा संदेश कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे.

mahayuti
शिंदे, अजित पवारांच्या पक्षाला स्वतंत्र लढण्याचे भाजप श्रेष्टींचे आदेश; रोहित पवार यांचा दावा

एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या पक्षाला भाजप स्वतंत्र लढायला सांगणार आहे. तसा आदेश भाजपच्या श्रेष्टींकडून आला आहे.

Mahadeo Shivankar and BJP politics
पडत्या काळात पक्षाची धुरा वाहणाऱ्या शिवणकरांची भाजपमध्ये उपेक्षाच

गोंदिया हा ज्यांना राजकीयदृष्ट्या मालकीचा वाटतो, त्याच्या निर्मितीतच शिवणकर यांचा सिहांचा वाटा होता, पण त्यांनी कधी या जिल्ह्यावर मालकी हक्क…

nashik bjp corporators joined shivsena
नाशिकमध्ये ठाकरे गटाचा भाजपला धक्का… माजी नगरसेविकेसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

गतवेळी महापालिकेत एकसंघ शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी नगरसेवकांच्या पळवापळवीला जोर आला.

Medha-Kulkarni-namaz Shaniwar-wada
“शनिवारवाड्यात चादर अंथरुन दुवा मागितली तर काय चुकलं?” नमाज पठणावरून महायुतीत राडा, राष्ट्रवादीचा नेत्या म्हणाल्या…

Medha Kulkarni on Shaniwar Wada : रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, “मेधा कुलकर्णी हिंदू व मुस्लीम समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. मला…

Ahilyanagar Municipal Corporation's final ward structure finally released after a week-long delay
अहिल्यानगर महापालिकेची अंतिम प्रभागरचना अखेर आठवडाभराच्या दिरंगाईने प्रसिद्ध; प्रभाग ९, १५ व १६ मध्ये बदल

महापालिकेची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असून प्रभागरचनेचे नकाशे, व्याप्ती मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत…

Protest in Shaniwarwada area led by Rupali Patil Thombre in protest against Medha Kulkarni
शनिवारवाडा: मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात रुपाली पाटील ठोंबरे यांचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपच्या नेत्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाला २४ तास होत नाही तोवर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या…

What Mahesh Kothare Said About BJP and Modi?
महेश कोठारेंचं वक्तव्य; “मी भाजपाचा भक्त आहे, मोदींचा भक्त आहे, मुंबईत कमळ…”

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. तसंच मी मोदी भक्त असल्याचंही म्हटलं आहे.

MLA Rohit Pawar's one-day symbolic fast
देहूमध्ये शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण; कर्जमाफीबाबत सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू…

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी आज आमदार रोहित पवार यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी रोहित…

Former Malegaon MLAs counter challenge BJP
BJP Politics : भाजपच्या ‘त्या’ नेत्यांना मी किंमत देत नाही…मालेगावच्या माजी आमदारांचे तोंडसुख

प्रत्युत्तर देत शेख यांनी संबंधित भाजप नेत्यांवर तोंडसुख घेतले आहे. भाजप नेत्यांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारत असल्याचे सांगत शेख यांनी…

संबंधित बातम्या