Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

पीयूष गोयल

पियूष गोयल हे भारतीय राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १३ जून १९६४ रोजी मुंबईत झाला. ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. पियूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे सुद्धा भाजपचे ज्येष्ठ नेते, खजिनदार होते तसेच आई चंद्रकांता गोयल या आमदार होत्या. त्यामुळे पियूष गोयल यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले.


३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पियूष गोयल यांनी भारतीय जनता पक्षात विविध पदांवर काम केलं आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. तसेच पक्षाचे कोषाध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या पियूष गोयल यांनी देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे.


पियूष गोयल २०१० मध्ये पहिल्यांदा आणि २०१६ मध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. गोयल यांनी कोळसा, ऊर्जा, रेल्वे, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार आतापर्यंत सांभाळलेला आहे. तसेच त्यानी संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.


२०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी साडेतीन लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. पियूष गोयल हे विद्यमान नरेंद्र मोदी सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत.


Read More
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती? प्रीमियम स्टोरी

४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. तर चार खासदारांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.

Piyush goyal bjp marathi news,
ओळख नवीन खासदारांची : पियूष गोयल, उच्चविद्याविभूषित आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा

नवी दिल्लीत गेली अनेक वर्षे काम करीत असताना गोयल हे पक्षश्रेष्ठींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

Bhushan Patil statement that the parachute candidate will not solve the problems of the people
उमेदवारांची भूमिका – उत्तर मुंबई; ‘ पॅराशूट ’ उमेदवार जनतेचे प्रश्न सोडविणार नाही – भूषण पाटील, काँग्रेस

पियूष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने ‘हाय प्रोफाईल ’ असून भाजप पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने ’ पॅराशूट ’ उमेदवार आहेत. या…

What Piyush Goyal Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंनी मोदी, देवेंद्र फडणवीसांचा विश्वासघात केला, त्यामुळेच..”, भाजपाच्या बड्या नेत्याची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंनी भाजपाचाच नाही तर शिवसेनेचाही विश्वासघात केला असंही पियूष गोयल यांनी म्हटलंं आहे.

Piyush goyal marathi news, Piyush goyal latest marathi news
हार-पुष्पगुच्छांचा खच, अभिवादनाचे हजारो हात, भाजप-मोदींच्या जयघोषात प्रचारफेरी..

चारकोप विधानसभा क्षेत्रातील बंदरपाखाडी गाव, गौरव गार्डन ते वीर सावरकर चौक या मार्गाने गोयल यांची प्रचारफेरी गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास…

Mumbai North development promise by BJP Piyush Goyal
मोदी हमीने ‘उत्तर मुंबई’चा गतीने विकास – पियूष गोयल यांचे प्रतिपादन

आरोग्य, शिक्षण, वाहतूक, दुर्बल घटकांसाठी आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टयांचा पुनर्विकास आणि पुनर्वसन करण्याची हमी देत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

lok sabha election 2024 piyush goyal varsha gaikwad and sanjay patil files nomination
Lok Sabha Election 2024 : पियूष गोयल, वर्षां गायकवाड, संजय पाटील यांचे अर्ज दाखल

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षां गायकवाड यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीन कोटींनी वाढ झाली आहे.

Piyush Goyal determination to make North Mumbai great Mumbai Maharashtra Day 2024
उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ करू; गोयल यांचा निर्धार ; राहुल गांधींनी लढण्याचे आव्हान

उत्तर मुंबईच्या लोकसेवकाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे.  विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला ‘उत्तम…

Union minister Piyush Goyal, BJP’s candidate for Mumbai North, interacts with supporters. (Express photo by Sankhadeep Banerjee)
पियूष गोयल यांच्या पहिल्याच प्रचारसभेत घुमला मतदारांचा सूर, “मुंबईचा आवाज आता दिल्लीत!”

प्रचाराच्या पहिल्या दिवशी विविध रहिवाशांशी संवाद साधल्यानंतर पियूष गोयल यांनी बोरीवली पश्चिम भागात असलेल्या बाभई नाका येथील राम मंदिराला भेट…

A great interaction with Union Minister Piyush Goyal in Loksatta Loksanwad
Piyush Goyal Interview: ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी खास गप्पा!

‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीतील…

Piyush Goyal: पीयूष गोयल यांच्यासाठी दक्षिण मुंबई ऐवजी 'उत्तर' मतदारसंघाची निवड का? | North Mumbai
Piyush Goyal: पीयूष गोयल यांच्यासाठी दक्षिण मुंबई ऐवजी ‘उत्तर’ मतदारसंघाची निवड का? | North Mumbai

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना राज्यसभेची तीन वेळा संधी दिल्यानंतर यंदा भाजपाने त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. वर्षांनुवर्षे राज्यसभेचं…

संबंधित बातम्या