जन्माष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी कृष्णाची आराधना केली जाते. श्रीकृष्णाच्या जीवनप्रवासातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या व्यक्तिमत्त्वातून आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र दिला. जन्माष्टमीच्या निमित्ताने आज आपण श्रीकृष्णाकडून कोणत्या गोष्टी शिकाव्यात, हे जाणून घेणार आहोत.

खरे प्रेम

वृंदावनमध्ये राधासह अनेक गवळणी कृष्णावर प्रेम करायच्या. कृष्णाने नेहमी या गवळणींचा आदर केला; पण त्याचे खरे प्रेम हे राधेवर होते. आजच्या तरुण मंडळींनी कृष्णाच्या या प्रेमापासून भरपूर शिकायला पाहिजे.

गुरूंचा आदर

कृष्ण हा विष्णूचा अवतार मानला जातो. तरीसुद्धा त्याचा मनात कायम गुरूविषयी आदर होता. प्रत्येक अवतारात कृष्णाने नेहमी संतांचा सन्मान केला.

हेही वाचा : फाटलेली किंवा जुनी बेडशीट फेकण्याची चूक तुम्हीही करता? या घरगुती जुगाडच्या मदतीने असा करा वापर

आई-वडिलांचा सन्मान

जरी कृष्ण देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र होता. तरी त्याचे पालन-पोषण यशोदा आणि नंद यांनी केले. त्यानंतरही कृष्णाने नेहमी त्याच्या जीवनात दोन्ही आईंना समान स्थान दिले. कृष्णाच्या या स्वभावातून तुम्हाला शिकायला मिळेल की, जगात आई-वडील नेहमी उच्च स्थानावर असतात आणि प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे.

मैत्री

कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचे गोडवे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. जीवन जगताना नाते कसे जपावे, हे तुम्हाला त्यांच्या मैत्रीतून शिकायला मिळेल. विशेष म्हणजे श्रीकृष्णाने कधी मैत्री करताना लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला नाही.

संघर्ष

श्रीकृष्णाचे जीवन संघर्षाने भरलेले होते. त्याच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, अडचणी आल्या तरीही कृष्णाने कधी हार मानली नाही. प्रत्येक संकटाला तो हसतमुखाने समोर गेला. संघर्ष हेच आयुष्य आहे, ही गोष्ट आपण श्रीकृष्णापासून शिकायला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)