scorecardresearch

Premium

IND vs AUS: टी-२०मध्ये प्रसिध कृष्णाच्या नावावर झाला नकोसा विक्रम, पुढच्या सामन्यात संधी मिळणार का? जाणून घ्या

IND vs AUS 3rd T20: भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने तिसऱ्या टी-२० सामन्यात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली. तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.

Prasidh Krishna made a unique record against Australia became the Indian bowler who spent the most runs in T20
प्रसिध कृष्णाने तिसऱ्या टी-२० सामन्यात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia 3rd T20: कर्णधार सूर्यकुमार यादवने शेवटचे षटक वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाकडे टाकायला दिले आणि तिथेच भारताने सामना गमावला. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला शेवटच्या षटकात कोणतीही अडचण आली नाही, त्याने आरामात फटके मारले आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. कृष्णाचा हा गोलंदाजी स्पेल भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा टी-२० स्पेल ठरला.

गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २२२ धावांची मोठी मजल मारली. ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत १२३ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत गायकवाडने १३ चौकार आणि ७ षटकार मारले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १३४ धावांवर ५ विकेट्स गमावल्या, त्यानंतर कांगारूंना ३९ चेंडूत विजयासाठी ८९ धावांची गरज होती. ग्लेन मॅक्सवेलने शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभे राहून रोमहर्षक सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG : टीम इंडियाच्या फलंदाजांनी टॉम हार्टलीसमोर टेकले गुडघे, इंग्लंडचा भारतावर २८ धावांनी दणदणीत विजय
IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG 1st Test : “द्रविडने शुबमनबरोबर…”, गिलच्या खराब कामगिरीनंतर केविन पीटरसनने दिला महत्त्वाचा सल्ला
Pope and Bumrah Controversy in Ind vs ENG 1st Test Match
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
Kevin Sinclair cartwheel
क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल

हेही वाचा: Rahul Dravid: मोठी बातमी! राहुल द्रविडच पुन्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, BCCIने वाढवला करार

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१ धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवने शेवटचे षटक प्रसिध कृष्णाला दिले. मॅथ्यू वेडने पहिल्या चेंडूवर चौकार मारून दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत मॅक्सवेलला स्ट्राइक दिली. मॅक्सवेलने सलग षटकार आणि २ चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. मॅक्सवेलने ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आता शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २ धावांची गरज होती, मॅक्सवेलने लाँग ऑफला चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर नकोसा विक्रम

कृष्णाने ४ षटकात ६८ धावा दिल्या, त्याला एकही विकेट घेता आली नाही. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका स्पेलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम कृष्णाच्या नावावर नोंदवला गेला आहे. मालिकेत भारत अजूनही २-१ने आघाडीवर आहे. चौथा टी-२० सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे, ऑस्ट्रेलियाला तो जिंकून मालिकेत बरोबरी साधून अंतिम सामना निर्णायक बनवायचा आहे. स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस आपल्या देशात परतत आहेत, ते चौथ्या आणि पाचव्या टी-२० मध्ये खेळणार नाहीत.

हेही वाचा: माजी खेळाडूने मुख्य प्रशिक्षकाची ऑफर नाकारल्याने बीसीसीआयची द्रविडला विनंती, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

प्रसिध कृष्णाला चौथ्या टी-२० सामन्यात संधी मिळणार का?

मुकेश कुमार त्याच्या लग्नामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील तीन सामन्यांमधून बाहेर होता. त्यानंतर दीपक चाहरचा संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे प्रसिध कृष्णाच्या जागी चाहरला संधी मिळू शकते. दुसरीकडे, श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सहभागी होणार आहे. आता चौथ्या सामन्यात दीपक आणि श्रेयसच्या आगमनाने प्लेइंग-११ मध्ये बदल होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This shameful record was registered in the name of prasidh krishna the most expensive spell of indian cricket avw

First published on: 29-11-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×