scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
CJI BR Gavia And Uddhav Thackeray Shiv Sena
CJI B.R. Gavai: “सरन्यायाधीश साहेब, जे बोललात ते करा”, बी. आर. गवई यांना ठाकरे गटाचे आवाहन; म्हणाले, “गद्दार आमदारांना…”

CJI B.R. Gavai: सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह…

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates: “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांची इच्छा नव्हती”, ठाकरे गटाचा दावा

Today’s News Update: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून…

more former corporators leave thackeray for shinde shivsena
उद्धव ठाकरे यांचे इतके माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांत मुंबईतील माजी नगरसेवकांनी एकेक करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्यास सुरुवात केली.

Devendra Fadnavis reverses housing ownership decision for Worli govt staff Mumbai
‘बीडीडी’तील सरकारी कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे नाहीच; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द

आपल्यालाही मालकी हक्काने घरे मिळावीत, अशी मागणी मुंबईतील तसेच इतर ठिकाणी शासकीय सेवानिवासस्थानात राहणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून सुरू झाली होती.

Uddhav and Raj Thackeray together! Shinde group ministers say...
उद्धव व राज ठाकरे एकत्र! शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, ‘आम्हाला मत विभाजनाचा फटका…’

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोघांचा एकत्रित फोटोही समाज…

World Tiger Day, jungle king, Uddhav Thackeray Photoshoot
15 Photos
International Tiger Day: उद्धव ठाकरेंनी फोटोग्राफी करताना टिपलेले वाघांचे सर्वोत्तम १३ फोटो

Uddhav Thackeray Photography, World Tiger Day: उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याआधीपासून फोटोग्राफी करतात. त्यांनी देशातल्या विविध व्याघ्र प्रकल्पात जाऊन जंगलाचा…

Rajan Vichare criticizes BJP and Shinde group as Thackeray family comes together
ठाकरे एकत्र आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे अशी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी खासदाराची टीका

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या निर्णयाने अनेकांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट)…

Sanjay Raut gave a reaction on Raj Thackeray at Matoshree on the occasion of Uddhav Thackerays birthday
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut: शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल (२७ जुलै) वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज…

Raj Thackeray Matoshree visit Thackeray brothers unite again as Raj visits Uddhav on his birthday at Matoshree
Raj Thackeray Matoshree Visit : वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.

Fadnavis says Maharashtras mind was clear in polls hints at more clarity in civic elections Maharashtra political updates
मुख्यमंत्री फडणवीसांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचे विधान; म्हणाले, “महाराष्ट्राच्या मनात…”

“महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते विधानसभा निवडणुकीत दिसले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते स्पष्ट होईल,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री…

संबंधित बातम्या