बिहारमध्ये यंदा दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका नियोजित करण्यात आल्या. त्यात ६ नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा तर ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची घोषणा करण्यात आली. बिहारमधील पुढचा सत्ताधारी ठरवण्यासाठी अर्थात निकालासाठी १४ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, १६ नोव्हेंबरपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यापैकी २०३ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर, ३८ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव आहेत.