Mumbai Maharashtra Breaking News Today, 06 December 2023: राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे हा मुद्दा तापू लागला आहे. तिकडे नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून सत्ताधारी व विरोधकांच्या पत्रकार परिषदांमधून अधिवेशनकाळ नेमका कसा जाणार आहे, त्याचा अंदाज येण्याची शक्यता आहे.
Today’s Breaking News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरूवारपासून नागपुरात सुरू होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ दोन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे.एकीकडे पावसाळी वातावरण आणि त्यामुळे तापमानात घट झाली असतानाच अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष रंगणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
उरण: मंगळवार हा उरणसाठी ठरला अपघात वार ठरला. दिघोडे मार्गावर कंटेनर वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. अवजड कंटेनर अपघातातील बळींची संख्या वाढू लागली. ग्रामस्थांचा उद्रेक दिघोडे नाक्यावर रस्ता रोको करीत निषेध नोंदवला.
पुणे: आदिवासीबहुल ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) या आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी ज्यादा आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज चिरकाल जतन करण्यासाठी शांतिवन चिचोली येथे संग्रहालयाची निर्मिती करण्यात येत आहे. शासनाने संग्रहालयाची भव्यदिव्य इमारत उभी केली आहे, मात्र त्यातील संग्रहालयचे कार्य अद्यापही अपूर्णच आहेत.
वर्धा, गीरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात संतापजनक घटना उजेडात आली आहे.या गावातील बावण वर्षीय आरोपीची सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर नजर गेली.त्याने एक वर्षापासून तिच्यावर अत्याचार सुरू केले होते.
कृत्रिम बुध्दीमत्ता हा येत्या काळात परवलीचा शब्द ठरणार तर. सावंगी येथील दत्ता मेेघे अभिमत विद्यापिठात ‘शिक्षण व तंत्रज्ञानात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईच्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी सत्यनारायणा बोलत होते.
चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्याने अरुंद झाल्यानंतर आता शहरातील मुख्य गांधी चौक ते जटपुरा गेट या मुख्य मार्गावर ‘संडे मार्केट’ने अतिक्रमण केल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, संडे मार्केटच्या या अतिक्रमणाकडे जिल्हा व पोलीस प्रशासनाप्रमाणेच महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
नागपूर : अधिवेशनासाठी येणाऱ्या विधानसभा व विधान परिषद सदस्यांची येथील आमदार निवासात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारत क्रमांक एकमध्ये माजी मुख्यमंत्री व शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने खोल्या आरक्षित आहेत.
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ११ डिसेंबरला नागपुरातील संघाच्या रेशीमबाग कार्यालयाजवळील मैदानातून विधानभवनात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मोर्चाला परवानगी नाकारल्यास ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा वळवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची अडथळ्यांची शर्यत काही थांबण्याचे नाव नाही.
ठाणे : महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत कि नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच मराठी देवनागरी भाषेत पाट्या नसणाऱ्यांवर कारवाई करताना सर्व आवश्यक बाबी तपासून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
पुणे: मैत्रिणीने प्रेमसंबंध तोडल्याने एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
ठाणे : सायकल मोहिमांना जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हिंदायान फाऊंडेशनतर्फे देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या सायकल मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी ठाणे ते मुंबई अशी सायकल मोहिम १७ फेब्रुवारीला होणार असून यादिवशी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी पाच किमी अंतराची सायकल मोहिमही आयोजित केली जाणार आहे.
सायकल मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि हिंदायान फाऊंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके उपस्थित होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे हिंदायान सायकल मोहिमांचा पुरस्कार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी झालेल्या मोहिमेत भारतीय लष्कर आणि नौदल संघांनी सहभाग घेतला होता.
यंदा ही सायकल मोहिम दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून जाणार आहे. नवी दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगर, अहमदाबाद, ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरातून ही मोहिम मार्गक्रमण करणार आहे, अशी माहिती हिंदायान फाऊंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके यांनी दिली. त्याचप्रमाणे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने सुचवल्याप्रमाणे शाळांतील मुलांसाठीही सायकल मोहिमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यास ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे १७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी ठाणे महापालिका शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच किमी अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतामध्ये लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा, शर्यती होत नाहीत. येथील सायकल स्वारांना ती संधी मिळावी या उद्देशाने हिंदायानतर्फे या शर्यती आणि मोहिमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे चापके यांनी स्पष्ट केले.
दिल्ली ते आग्रा – यमुना एक्सप्रेस वरून (२२० किमी), मुंबई – पुणे जुना हायवे आणि १०० किमींच्या प्रत्येकी तीन शर्यतींत व्यावसायिक सायकलस्वार सहभागी होऊ शकतील. तसेच इतरांना ठाणे ते मुंबई- वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गे, मुंबई ते वाशी, लोणावळा ते पुणे आणि अहमदाबाद ते गांधीनगर या सायकल मोहिमा आहे.
मुंब्रा बायपासवर रात्री पैसे जमा करणारे कोण आहेत? – व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचा सवाल
रात्रीचे मुम्ब्रा बायपास वर पैसे जमा करणारे हे कोण आहेत ?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2023
दोन दोन तास ट्रॅफिक जाम असतो ..
@ThaneCityPolice pic.twitter.com/1lab72ixh3
भाईंदर : मीरा भाईंदर शहरात तीन ठिकाणी मल नि:सारण केंद्राचा विकास करण्याच्या दुष्टीने तब्बल १५४ झाडे कापण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. या झाडाच्या मोबदल्यात ४९८ नग झाडे ही रस्त्याच्या दुतर्फा तर ११२ झाडांचे पुर्न:रोपण करण्याचा ठराव प्रशासनाने मंजूर केला आहे.मात्र इतक्या मोठ्या संख्येने झाडे कापली जात असल्यामुळे प्रशासनाच्या कामाजाकावर पर्यावरण प्रेमी कडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मीरा भाईंदर मधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शहरात ११ ठिकाणी मल नि:सारण प्रकल्प उभारले आहेत. परंतु शहरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता यात वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे महापालिकेने शहरातील तीन विविध ठिकाणी हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.यात मीरा रोड येथील अय्यप्पा मंदिर शेजारी असलेला भूखंड, १५ नंबर बस स्टॉप शेजारी असलेला भूखंड आणि भाईंदर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या भूखंडाची निवड करण्यात आली आहे.
मात्र या केंद्राची उभारणी करण्यापूर्वी विविध प्रजातीची १५४ झाडे कापावी लागणार असल्याचे सर्वेक्षण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.यातील ११२ झाडांचे पुर्न:रोपण करणे शक्य असले तरी ४२ झाडे ही मुळासकट काढावी लागणार आहे.त्यामुळे नियमाप्रमाणे ४२ झाडे कापत असताना त्यांच्या अंदाजित वयोमानानुसार जवळपास ४९८ नग झाडे लावण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाकडून देण्यात आला आहे. शिवाय ही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे एकूण १५२ झाडे कापत असल्याचे महापालिकेने वृत्तपत्रात तसेच संकेत स्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर कोणतीही हरकत अथवा सुचना न आल्यामुळे त्यास प्रशासकीय मंजुरी देत असल्याचा ठराव महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी मंजुर केला आहे.मात्र एकीकडे प्रदूषणात झालेली वाढ समोर असताना देखील नागरी वस्तीतील १५४ झाडे कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेणे धक्कादायक असल्याचे मत पर्यावरण प्रेमी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.
कोणत्या ठिकाणी किती झाड कापली जाणार.?
ठिकाण- झाडांची संख्या
मीरा रोड अय्यप्पा मंदिर (झोन ६)- १०४
मीरा रोड १५ नंबर बस स्टॉप (झोन ८)- ४०
भाईंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (झोन ४) १०
इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वाच्या चेहऱ्याविषयी चर्चा होईल. उद्धव ठाकरे हे एक हिंदुत्ववादी व राष्ट्रीय चेहरा आहेत. ज्या व्यक्तीला इंडिया आघाडीची मंजुरी मिळेल, ती व्यक्ती आघाडीची पंतप्रधानपदाची उमेदवार असेल. याव्यतिरिक्त मला याबाबत काही म्हणायचं नाही. मला बाहेर असं काहीही बोलायचं नाही ज्यामुळे आघाडीमध्ये मतभेद निर्माण होतील – संजय राऊत
#WATCH | On PM face of INDIA bloc, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says," There will be a discussion on this. There should indeed be a face…Uddhav Thackeray is a Hindutvawadi, nationalist face. A person who gets the approval of the INDIA alliance members can be the (PM) face. I… pic.twitter.com/NXVwOHUC4V
— ANI (@ANI) December 6, 2023
मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी नागपूर विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय अजित पवार गटाचंच असल्याची भूमिका घेतली आहे. “शरद पवार गटाचे नेते तिथे आले, तर त्यांना चहा-नाश्ता देऊ”, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटही कार्यालयांवरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनात होणार का? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)
Today’s Breaking News Updates: मराठा आरक्षण, हिवाळी अधिवेशन व इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा