-
मराठी तसेच हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाने अमृता खानविलकरने सगळ्यांची मन जिंकली आहेत.
-
‘चंद्रा’, ‘वाजले की बारा’ अश्या सुपरहिट गाण्यांवर आपल्या नृत्य कौशल्याने अमृताने प्रेक्षकांना भुरळ पाडली.
-
अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी अनेकदा चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
अमृताचा डेनिम ऑन डेनिम लूक सध्या चर्चेत आहे.
-
डेनिम स्कर्ट, डेनिम जॅकेट आणि ब्लॅक ब्रालेट असा क्लासिक लूक अमृताने केला आहे.
-
या लूकसाठी खुले केस, गोल्डन ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपची अमृताने निवड केली आहे.
-
“प्रचंड उन्हामुळे पार्किंगमध्ये फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला” असं मजेशीर कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
-
हटके पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.
-
“उन्हाळ्यात जेव्हा ऊन आपल्या चेहऱ्यावर येतं तेव्हा आपल्यापैकी बहुतेकजण असं करतात” चेहऱ्यावर हात ठेवून पोज देत असताना तिला असं कॅप्शन सुचलं. (All Photos- amrutakhanvilkar/Instagram)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या