-
दसऱ्याचा लाँग वीकेंड येऊन ठेपला आहे आणि या निमित्ताने तुम्हाला काही सर्वोत्तम भारतीय वेब सिरीजचा आनंद घ्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास निवडक वेब सिरीजची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये ऐतिहासिक कथांपासून विविध शैलींचा समावेश आहे. तर मग घरबसल्या या उत्तम वेब सिरीजचा आनंद घ्या. (Still From Film)
-
The Legend of Hanuman
तुम्ही दसऱ्यासाठी धार्मिक आणि पौराणिक मूडमध्ये असल्यास, Disney+ Hotstar वर ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ स्ट्रीमिंगचा आनंद घ्या. ही ॲनिमेटेड सिरिज हनुमानाच्या कथांवर आधारित आहे. त्याचे पहिले चार सीझन आधीच उपलब्ध आहेत आणि त्याचा पाचवा सीझन २५ ऑक्टोबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. ही सिरिज प्रेक्षकांना हनुमानाच्या शौर्य आणि महानतेची ओळख करून देते, जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी उत्तम आहे. (Still From Film) -
Call Me Bae
अनन्या पांडेची डेब्यू वेब सीरिज ‘कॉल मी बे’ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे. तुम्हाला हलक्याफुलक्या आणि मनोरंजक कथांची आवड असेल, तर हा पर्याय तुमच्यासाठी आहे. ही सीरिज ग्लॅमरस जीवनशैली आणि मजेदार क्षणांनी भरलेली आहे. (Still From Film) -
Angry Young Men: The Salim-Javed Story
ही डॉक्युमेंट्री बॉलिवूड चाहत्यांसाठी खजिन्यापेक्षा कमी नाही. हा माहितीपट हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पटकथा लेखक सलीम-जावेद या जोडीची कथा सांगते. प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेली ही डॉक्युमेंटरी ज्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक कथा समजून घ्यायच्या आहेत त्यांनी जरूर पाहा. (Still From Film) -
IC 814: The Kandahar Hijack
तुम्हाला खऱ्या घटनांवर आधारित थ्रिलर मालिका पाहणे आवडत असल्यास, नेटफ्लिक्सवर ‘IC 814: The Kandahar Hijack’ स्ट्रीमिंग करणे तुमच्यासाठी योग्य आहे. ही अनुभव सिन्हा यांची वेब सिरीज आहे, जी कंधार हायजॅकच्या सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये विजय वर्मा आणि अरविंद स्वामी यांसारख्या स्टार्सनी जबरदस्त अभिनय केला आहे. (Still From Film) -
Manvat Murders
तुम्हाला गुन्हेगारी आणि रहस्यमय-थ्रिलर्समध्ये स्वारस्य असल्यास, SonyLIV वर ‘Manwat Murders’ स्ट्रीमिंग करून नक्की पहा. या मराठी क्राईम थ्रिलरमध्ये आशुतोष गोवारीकरची भूमिका आहे आणि एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्याचे निराकरण डीसीपी रमाकांत कुलकर्णी यांनी केले आहे. (Still From Film) -
Taaza Khabar
YouTuber अभिनेता भुवन बामची थ्रिलर वेब सीरिज ‘ताजा खबर’ Disney+ Hotstar वर प्रसारित होत आहे. याचे दोन सीझन उपलब्ध आहेत, ज्यात जावेद जाफरी, श्रिया पिळगावकर आणि देवन भोजानी देखील आहेत. हा शो तुमचा वीकेंड आणखी मजेशीर बनवेल. (Still From Film) -
Tanaav
इस्रायली वेबसीरिज ‘फौदा’ची रिमेक असलेली ‘तणाव’ भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या सीरिजचा दुसरा सीझन नुकताच SonyLIV वर रिलीज झाला आहे. मानव विजच्या दमदार अभिनयाने सजलेली ही वेबसीरिज एक उत्कंठावर्धक थ्रिलर आहे, जी तुम्हाला खिळवून ठेवेन. या वेबसीरीजमध्ये दहशतवाद आणि काश्मीरच्या संवेदनशील मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला आहे. (Still From Film)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक