-
भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज (१ जुलै) निवड करण्यात आली आहे (संग्रहित छायाचित्र)
-
‘काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या निवडीबाबत भाजपाने मुंबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता. (संग्रहित छायाचित्र)
-
या कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (image source – Ravindra Chavan FB page)
-
त्यानंतर आज रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. (Express Photo: Akash patil)
-
यावेळी मावळते अध्यक्ष्य चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती पाहायाला मिळाली. (Express Photo: Akash patil)
-
ही भाजपाच्या नरीमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयातील छायाचित्रे आहेत. (Photo: Chandrashekhar Bawankule/X)
-
बावनकुळेंच्या शुभेच्छा
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत रविंद्र चव्हाणांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Express Photo: Akash patil) -
भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हण यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रदेश कार्यालयात त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे त्यांना सुपूर्द केली. त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा, अशा शब्दांत बावनकुळेंनी ट्वीट केलं आहे. (Photo: Chandrashekhar Bawankule/X) हेही पाहा-जगातील ९ मोठ्या कंपन्यांचे सीईओ आहेत भारतीय; त्यांचे शिक्षण किती आहे माहितीये का?

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान