scorecardresearch

 

लोकसत्ता क्विझमध्ये सहभागी होण्यासाठीच्या नियम आणि अटी –


. ही स्पर्धा भारतातील सर्व वाचकांसाठी खुली असेल.


. प्रत्येक स्पर्धेची एक अंतिम तारीख असेल, त्या तारखेपर्यंत क्विझ स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.


. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.


. १८ वर्षांवरील कुणीही व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते.


. बक्षीसपात्र क्विझ ज्या स्पर्धकाच्या इ-मेल/ मोबाईल क्रमांकाद्वारे नोंद झाले आहे, त्याच्याशी इमेलद्वारे संपर्क साधण्यात येईल.


. बक्षीस स्वीकारण्यासाठी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्स यापैकी कोणतेही एक) ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे.


. क्विझ सबमिट केल्यानंतर स्पर्धकांना कोणत्याही कारणाने सहभाग मागे घेण्यास अनुमती नाही.


. बक्षीस अहस्तांतरणीय, अदलाबदल न करता येण्याजोगे आणि ना-परतावा आहे. बक्षिसाऐवजी रोख रक्कम दिली जाणार नाही. विजेत्यानेच बक्षीस स्वीकारायचे आहे.


. आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेडचा कोणताही कर्मचारी अथवा त्याच्या कुटुंबीयांस या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.


१०. बक्षीस कूपन वितरित केल्यानंतर त्यासंदर्भात आयोजक कंपनीची कोणतीही जबाबदारी असणार नाही. कूपन—- मायंत्राचे असेल तर त्यांच्या नियम व अटी बक्षिसासाठी लागू असतील असेही यात समाविष्ट करावी, अशी लीगलची सूचना आहे. – महत्त्वाचे.


११. या स्पर्धेचे आयोजक (आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेड) यांनी कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता सदर स्पर्धा आणि/ किंवा तिचे संबंधित नियम यात बदल करण्याचा, तसेच ही स्पर्धा तहकूब, रद्द किंवा सुधारित करणे, तसेच यात अन्य कोणत्याही प्रकारे भर घालणे/ वाढ करणे किंवा विभाजन करणे इत्यादीचे, तसेच बक्षिसामध्ये बदल करण्याचे आयोजकांचे अधिकार राखून ठेवले आहेत. स्पर्धेत व जागेवर प्रवेश देणे/ नाकारणे याचेही अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत.


१२. कमीत कमी वेळेस सर्व उत्तरे बरोबर असणारे क्विझ सबमिट करणाऱ्यास विजेता घोषित करण्यात येईल. एकाहून अधिक स्पर्धकांनी कमीत कमी वेळेस क्विझ सबमिट केलेले असल्यास त्याबरोबर सर्वोत्कृष्ट घोषवाक्य मी लोकसत्ता डॉटकॉम वाचतो कारण त्यास विजेता घोषित करण्यात येईल.


१३. विजेते ठरविणे यासाठी आयोजक (दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड) यांचे अंतर्गत परीक्षक मंडळ नियुक्त करेल. परीक्षकांचा व दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील.


१६. स्पर्धेसंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण contact@loksatta.com या इमेल आयडीवर संपर्क साधू शकता. इमेलच्या सब्जेक्टमध्ये मात्र ‘क्विझ स्पर्धा’ असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.


१६. स्पर्धा आयोजक विजेत्यांची नावं जाहीर करतील. बक्षिसाऐवजी कोणतीही रोख रक्कम किंवा मोबदला दिला जाणार नाही.


१७. आपण सबमिट केलेले क्विझ हाच आपला स्पर्धेतील सहभाग असेल. क्विझ संदर्भातील सर्व अधिकार आयोजक आयइओएमएसपीएल यांच्या अधीन असतील. आपला स्पर्धेतील सहभाग हाच अटी आणि शर्ती मान्य असल्याचे संमतीसूचक मानण्यात येईल.


१८. नियम आणि अटींचा स्पर्धक सहभागींकडून भंग झाला आहे असे निदर्शनास आल्यास लोकसत्ता डॉट कॉम आणि आयइओएमएसपीएल कडे बक्षिसासंदर्भातील सर्वाधिकार राहतील. ते बक्षीस गोठविण्याचा अधिकारही त्यात समाविष्ट आहे.


१९. मुंबईतील न्यायालयाच्या विशेष कार्यक्षेत्रातच याचा समावेश असेल.

{